Pune crime: किरकोळ कारणावरून मारहाण, कोयत्याचा धाक दाखवून लूटमार अशा अनेक घटना पुण्यातून समोर येत असताना आता एक वेगळाच प्रकार समोर आलाय . वेश्यागमनासाठी बुधवार पेठेत जाणाऱ्या लोकांचा घरापर्यंत पाठलाग करत ऑनलाईन पैसे टाकतो कॅश द्या असं म्हणत पैसे उकळल्याचा प्रकार घडलाय . पैसे घेऊन ऑनलाईन न टाकता उलट तुम्ही बुधवार पेठेतून फिरत आहात असं सांगत तुमची बदनामी करू असं धमकावत त्यांच्याकडून पैसे लुटले. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय .
नेमका प्रकार काय?
बुधवार पेठेत वेश्यागमनासाठी जाणाऱ्या लोकांचा पाठलाग करत नंतर त्यांच्या घरापर्यंत जात पैसे उकळत असल्याचा प्रकार पुण्यातील नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून समोर आला .याप्रकरणी पुणे पोलिसांनी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या . आयुष राजू चौगुले, सदफ पठाण असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत . या प्रकरणातील आरोपी असणारे दोघे जण हे फिर्यादी बुधवार पेठेत गेले असता त्याचा पाठलाग करत त्याच्या घरापर्यंत आले आणि तुम्ही आमच्याकडून 20 हजार रुपये ऑनलाइन देतो अशी बतावणी करत पैसे द्या अन्यथा आम्ही तुमची बदनामी करू अशी धमकी दिली . आम्हाला पैसे द्या अन्यथा बुधवार पेठेत गेलात अशी तुमची बदनामी करू अस फिर्यादीला धमकावले . एवढ्यावरच न थांबता आरोपींनी पोलीस हेल्पलाइनवर कॉल करत आमच्याकडून 20 हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची पोलिसात तक्रार द्यायला सुरुवात केली . त्यानंतर नांदेडला पोलीस घटनास्थळी दाखल होऊन या सगळ्या प्रकरणाची शहानिशा केली . त्यानंतर पोलिसांच्या लक्षात आलं की हे दोन आरोपी फिर्यादीची फसवणूक करत आहेत . त्यानंतर या दोन्ही आरोपींना नांदेड सिटी पोलिसांनी अटक केली.
जळालेल्या मृतदेहासोबत फोन दिसला संशयाची सुई फिरली
मंगळवेढा तालुक्यातील पाठकळ याठिकाणी एका विवाहितेचा जळालेला मृतदेह आढळला. नंतर संबंधित विवाहिताच जिवंत असल्याचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. मात्र या विवाहितेने चुलत दीराच्या म्हणजेच प्रियकराच्या मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःचा आत्महत्येचा बनाव रचला.एखाद्या सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशा रीतीने एक धक्कादायक घटना समोर आली असून पोलिसांनी हा सर्व बनाव उघडा पाडला आहे. आता यामध्ये जळालेली महिला कोण याचा पोलीस शोध घेत असून विवाहिता व तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक करण्यात आली आहे .
हेही वाचा