Puen Crime News : नुकत्याचपारपडलेल्यादेशाच्या 80व्या स्वातंत्र्यदिनी देशभरातमोठाउत्साहबघायलामिळाला. तरअनेकांनी 15 ऑगस्टच्या सुट्टीमुळे पर्यटनस्थळी भेट देतआनंदसाजराकेल्याचेबघायलामिळाले. अशीचकाहीशी पर्यटकांचीगर्दीशिवरायांच्याऐतिहासिककिल्ले सिंहगडावर (Sinhgad Fort) देखीलबघायला मिळाली. मात्रया पर्यटकांच्या प्रचंड गर्दीमुळे पुणे दरवाजा परिसरात मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. याच गर्दीदरम्यान दोन गटांमध्ये काही कारणावरून वाद झाला. कालांतराने हा वाद (Pune Crime News) वाढत जाऊन थेट हाणामारीत रूपांतरित झाल्याची माहिती समोर आली आहे. या मारामारीत काही तरुणांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. तरयातीलएकानेभलामोठादगडहातातघेऊनदुसऱ्यागटातीलतरुणावरभिरकावल्याचेदिसूनयेतआहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. (Pune Crime News) 

Continues below advertisement

मात्र, स्वातंत्र्यदिनासारख्या दिवशी पर्यटनस्थळी असा प्रकार घडणे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. गर्दीच्या पर्यटनस्थळी पर्यटकांनी संयम राखणे, किरकोळ कारणांवरून वाद टाळणे आणि प्रशासनाला सहकार्य करणे आवश्यक आहे. मात्रप्रचंडगर्दीतहीदोनगटातहोणाऱ्याहातुफानराड्याच्याव्हिडीओमुळेअनेकप्रतिक्रियासमाजमाध्यमांवरउमटतआहे.

Pune News : पुण्यातील खड्ड्यांचा पाठपुरावा आता वाहतूक पोलीस करणार; पोलीस आयुक्तांचे आदेश

Continues below advertisement

पुण्यातील विविध भागात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. याच खड्ड्यांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी आणि अपघात देखील होतात. त्यामुळे पुणे पोलीस आयुक्त यांनी वाहतूक पोलिसांना रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करावा, असे आदेश दिलेले आहेत. त्यामुळे आता वाहतूक पोलिसांना पुण्यातील खड्ड्यांची माहिती महापालिकेला द्यावी लागणार आहे. ज्या रस्त्यांवर जास्त वाहतूक कोंडी होते त्या रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती देखील लवकरात लवकर महापालिकेकडे द्यावी लागणार आहे. त्यानंतर अधिकाऱ्यांशी बोलून ते खड्डे तातडीने नीट करून घेण्याचं कामही वाहतूक पोलिसांना अपेक्षित असल्याचं पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.

Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा, तर सगळे प्रश्न सुटतील: आनंद दवे 

श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा, तर सगळे प्रश्न सुटतील, असं मत हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी व्यक्त केलं आहे. येणाऱ्या काळात अजून गर्दी वाढेल. त्यामुळे विश्वास्थानी आताच त्याचा विचार करावा, असाही त्यांच म्हणणं आहे. पोलीस ठाणे हलवणार ते ठाणे हलवून बरेच दुकान आलेल्या कॉम्प्लेक्समध्ये करणार आहेत. मग कॉम्प्लेक्स मधील व्यवसायिकांनी काय करायचं? फुल मार्केट आहे, त्यांनी काय करायचं? वाहतूक कोंडीचं काय? दगडूशेठ मंदिराची गर्दी कमी होणार नाही म्हणून काही जागा सुचवत आहोत. शनिवार वाडा, लाल महाल, नदी पात्र यापैकी कुठेही मंदिर होऊ शकत नाही का? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या