Pune Crime News : पुण्यात बिश्नोई गँगकडून (Lawrence Bishnoi Gang) पुन्हा व्यापार्यांना खंडणीसाठी धमकीचा फोन आल्याचीखळबळजनकमाहितीसमोरआलीआहे. पुण्यातील एका बड्या व्यापाऱ्याकडे बिश्नोई गँगकडून (Bishnoi Gang) तब्बल 2 कोटींची मागणी करण्यातआलीआहे. दरम्यान, एका आठवड्यात पुण्यात तिसऱ्यांदा बिश्नोई गॅंगकडून (Bishnoi Gang News) व्यापाराकडे खंडणी मागण्यात आल्याच्याप्रकरारानेशहरातभीतीचवातावरणनिर्माणझालंआहे. याप्रकरणीपोलीस (Pune Police)अधिकतपासकरतआहे. मात्र गेल्या एका आठवड्यात पुण्यात बिष्णोई टोळीकडूनयेणाऱ्या खंडणीच्यामागणीने व्यापारीवर्गातचिंतेचंवातावरणआहे. (Pune Crime News)
Pune Crime News: 'स्वतःची काळजी घ्या' 2 कोटी तयार ठेवण्यास सांगून जीवे मारण्याची धमकी
मिळालेल्यामाहितीनुसार, पुण्यातील उत्तम नगर भागात व्यापाऱ्याला फोन करून खंडणीसाठी धमक देण्यात आलीय. या प्रकरणी उत्तमनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर शनिवारी सकाळी इंटरनेट-कॉलवर या व्यापाराला धमकीचा फोन आला. त्याने आपली ओळख शुभम लोणकर अशी करून दिली. तक्रारदार उत्तमनगर-शिवणे मर्चंट्स असोसिएशनचे पदाधिकारी असल्याचे सांगताना त्याने त्यांचा बांधकाम व्यवसाय, कारचा नोंदणी क्रमांक तसेच दैनंदिन हालचालींची माहिती असल्याचा दावा केला. याचवेळी कुटुंबातील सदस्यांची माहिती असल्याचे सांगत स्वतःची काळजी घ्या, असा इशारा देत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर 2 कोटी तयार ठेवण्यास सांगून पुढील सूचना लवकरच देऊ, असे बजावले. यानंतर तक्रारदारांनी तत्काळ उत्तमनगर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली.
Pune Crime News: पुण्यात बिष्णोई टोळीने खंडणी मागण्याच्या ही तिसरी घटना
गेल्या आठवड्यात पुण्यात बिष्णोई टोळीने खंडणी मागण्याची ही तिसरी घटना आहे. 22 जून रोजी वानवडी परिसरातील एका स्टील उद्योगपतीकडे 50 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. त्यानंतर मांतरवाडी येथील त्यांच्या कारखान्यावर गोळीबार केला होता. 23 जून रोजी वडकी येथील औषध घाऊक विक्रेत्याकडे 2 कोटींची खंडणी मागण्यात आली होती.
Lawrence Bishnoi: कोणआहे लॉरेन्स बिश्नोई?
लॉरेन्स बिश्नोई याचं खरं नाव सतविंदर सिंग आहे. त्याचा जन्म 1993 मध्ये पाकिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या पंजाबमधील फिरोजपूर जिल्ह्यातील एका गावात झाला. बिश्नोईने कॉलेजच्या काळातच गुन्हेगारीच्या जगात प्रवेश केला होता. लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात कैद आहे. त्याच्यावर खून, खुनाच्या उद्देशाने हल्ला, चोरी, दरोडा, खंडणी असे सुमारे 50 गुन्हे दाखल आहेत. सिद्धू मूसवाला आणि जयपूरमध्येकरणी सेनेच्या अध्यक्षाची हत्या तसेच पंजाबी गायक गिप्पी ग्रेवाल आणि एपी धिल्लन यांच्यावर झालेल्या गोळीबारातही त्याचे नाव पुढे आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
