एक्स्प्लोर

Pune Crime News: जामिनावर बाहेर येताच पाचव्या दिवशी 'गेम'! पुण्यात तरूणीवर हल्ला केलेल्या आरोपीला मध्यरात्रीचं संपवलं, आधी केलेल्या गुन्ह्यामुळं गमावला जीव

Pune Crime News: हत्येमागे जुना वाद आणि एका तरुणीशी संबंधित प्रकरण असल्याची माहिती समोर आली आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृण (Pune Crime News) हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात (Pune Crime News) एक जण गंभीर जखमी झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला रात्री अटक केली असून दुसरा आरोपी फरार (Pune Crime News)होता त्यालाही आज अटक केली आहे. मृत तरुणाचे नाव हमीद शेख असे असून त्याचा मावसभाऊ अर्षद शेख हा गंभीर जखमी झाला आहे. रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली. अनिकेत सूर्यवंशी आणि त्याचा भाऊ विशाल सूर्यवंशी यांनी धारदार शस्त्राने (Pune Crime News) वार करत दोघांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात हमीद शेख याचा जागीच मृत्यू झाला, तर अर्षद याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(Pune Crime News)

घटनेची माहिती मिळताच काळेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी अनिकेत सूर्यवंशी याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा आरोपी विशाल सूर्यवंशी हा फरार होता त्याचा शोध घेऊन पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.(Pune Crime News)

Pune Crime News: आधी केलेल्या गुन्ह्यामुळं गमावला जीव 

दरम्यान, प्राथमिक तपासात या हत्येमागे जुना वाद आणि एका तरुणीशी संबंधित प्रकरण असल्याची माहिती समोर आली आहे. हमीद शेख हा अवघ्या पाच दिवसांपूर्वीच जामिनावर तुरुंगातून बाहेर आला होता. चार महिन्यांपूर्वी त्याने एकतर्फी प्रेमातून एका तरुणीवर हल्ला केल्याचा आरोप होता. या प्रकरणात त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि तो तुरुंगात होता. हमीद जामिनावर सुटल्यानंतर तो पुन्हा संबंधित तरुणीला त्रास देईल, अशी भीती मुलीच्या कुटुंबीयांना होती. संबंधित तरुणीचे कुटुंबीय आणि आरोपी सूर्यवंशी बंधू हे एकमेकांचे निकटवर्तीय असल्याची माहिती समोर आली आहे. तरुणीच्या आईने हमीद बाहेर आल्याबाबत चिंता व्यक्त करत आरोपींकडे भीती बोलून दाखवली होती. त्यानंतरच हा हल्ला झाल्याने पोलिस या सर्व घडामोडींचा तपास करत आहेत.या घटनेमुळे काळेवाडी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Pune Crime News:  तरुणीच्या आईने भीती व्यक्त केली अन्...

हल्ला झालेला हमीद शेख पाच दिवसांपूर्वी तुरुंगातून जामिनावर बाहेर आला. चार महिन्यांपूर्वी एक तरुणीवर एकतर्फी प्रेमातून त्याने हल्ला केला होता. याचं प्रकरणात हत्येचा प्रयत्न केला म्हणून तो तुरुंगात होता. ही शिक्षा भोगत असताना जामिनावर तो बाहेर आला. हमीद बाहेर आल्यानं तो पुन्हा मुलीला त्रास देईल, अशी भीती मुलीच्या कुटुंबीयांनी होती. याचं भीतीतून ही धक्कादायक घटना घडली. तरुणीचे कुटुंबीय हे आरोपींचे निकटवर्तीय आहेत. तरुणीच्या आईने आरोपींना हमीद जामिनावर बाहेर आलाय. आता तो पुन्हा मुलीला त्रास देईल, अशी चिंता आरोपींकडे व्यक्त केली होती. या दृष्टीने ही तपासाची चक्र फिरू लागलेली आहेत.

एबीपी माझा सोबत 7 वर्षांपासून, 13 वर्षांचा पत्रकारितेचा अनुभव...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Census 2027 : ओबीसी कॉलम नसल्यानं जनगणनेला विरोध, लाखनी नगरपंचायतने थेट बजावली नोटीस, भंडारा जिल्ह्यात प्रशासनानं बजावलेल्या पहिल्याच नोटीसनं ओबीसींमध्ये तीव्र नाराजी
ओबीसी कॉलम नसल्यानं जनगणनेला विरोध, लाखनी नगरपंचायतने थेट बजावली नोटीस, भंडारा जिल्ह्यात प्रशासनानं बजावलेल्या पहिल्याच नोटीसनं ओबीसींमध्ये तीव्र नाराजी
Dadar Best Bus Accident : डोळ्यात सुखी संसाराची स्वप्नं, घरात लग्नाची लगबग; पण काळानं घात केला अन् दादर बेस्ट बस अपघातात एका क्षणात सर्वस्व गमावलं!
डोळ्यात सुखी संसाराची स्वप्नं, घरात लग्नाची लगबग; पण काळानं घात केला अन् दादर बेस्ट बस अपघातात एका क्षणात सर्वस्व गमावलं!
Vasai Crime News: इमारतीपर्यंत पाठलाग केला, मग हळूच महिलेच्या फ्रॅाकमध्ये खालून हात घातला; वसईमधील धक्कादायक प्रकार, रात्री 10.45 वाजता काय घडलं?
इमारतीपर्यंत पाठलाग केला, मग हळूच महिलेच्या फ्रॅाकमध्ये खालून हात घातला; वसईमधील धक्कादायक प्रकार
Hingoli : संतापजनक! हिंगोलीत लाखो रुपये खर्चून आणलेल्या तीन नव्या कोऱ्या शववाहिका धूळ खात; वर्षभरापासून हस्तांतरण प्रलंबित
संतापजनक! हिंगोलीत लाखो रुपये खर्चून आणलेल्या तीन नव्या कोऱ्या शववाहिका धूळ खात; वर्षभरापासून हस्तांतरण प्रलंबित
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanbhajinagar District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीची एन्ट्री? नेत्यांच्या नातलगांचीच चर्चा | ABP Majha
Sai Baba Temple Prasad Adulterated Pedha FDA Raid : साईंच्या भक्तांशीभेसळीचा खेळ | Special Report
Girish Mahajan On Operation Blue Star : महाजनांच्या अमृतसरमधील विधानावरून वाद | Special Report
INDIA Alliance Meeting : पंतप्रधानपदाचा चेहरा जाहीर करा; ठाकरेंची मागणी | Special Report
Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navale Bridge Accident : मध्यरात्री नवले पुलावर थरारक अपघात; सिमेंट टँकर थेट दुचाकीवर उलटला अन् 'मृत्यूचं तांडव'
मध्यरात्री नवले पुलावर थरारक अपघात; सिमेंट टँकर थेट दुचाकीवर उलटला अन् 'मृत्यूचं तांडव'
MNS On Jain Community White Line Controversy Mumbai Road: मुंबईत रस्त्यांवर जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, कडक शब्दात इशारा!
मुंबईत रस्त्यांवर जैन धर्मगुरुंसाठी पांढऱ्या पट्ट्या; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, कडक शब्दात इशारा!
Maharashtra School: राज्यातील शाळा कधी सुरु होणार, 15 जून की 22 जून? शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
राज्यातील शाळा कधी सुरु होणार, 15 जून की 22 जून? शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय
Devendra Fadnavis On Eknath Shinde: एकनाथ शिंदेंना डावलले, देवेंद्र फडणवीस संतापले; मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पडसाद, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदेंना डावलले, देवेंद्र फडणवीस संतापले; मंत्रिमंडळाच्या बैठकीतही पडसाद, नेमकं काय घडलं?
America missile attack on Iran: इराणने अपाचे हेलिकॉप्टर पाडलं, अमेरिकेचा होमुर्झवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा, युद्ध पुन्हा भडकणार?
इराणने अपाचे हेलिकॉप्टर पाडलं, अमेरिकेचा होमुर्झवर क्षेपणास्त्रांचा जोरदार मारा, युद्ध पुन्हा भडकणार?
Rajya Sabha Election 2026 Meenakshi Natarajan: मध्य प्रदेशात राज्यसभा निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा, इकडे काँग्रेसने आमदारांना रिसॉर्टवर नेण्याचा प्लॅन आखला, तिकडे एका चुकीमुळे भाजपचा उमेदवार थेट विजयीच झाला
राज्यसभा निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा, काँग्रेसचा आमदारांना रिसॉर्टवर नेण्याचा प्लॅन, पण एका चुकीमुळे भाजपचा उमेदवार थेट विजयीच झाला
Vasai Crime News: इमारतीपर्यंत पाठलाग केला, मग हळूच महिलेच्या फ्रॅाकमध्ये खालून हात घातला; वसईमधील धक्कादायक प्रकार, रात्री 10.45 वाजता काय घडलं?
इमारतीपर्यंत पाठलाग केला, मग हळूच महिलेच्या फ्रॅाकमध्ये खालून हात घातला; वसईमधील धक्कादायक प्रकार
Maharashtra Live blog updates: विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार, उर्वरित शाळा 15 जूनपासून; शिक्षण विभागाकडून निर्णयात बदल
Maharashtra Live blog updates: विदर्भातील शाळा 22 जूनपासून सुरू होणार, उर्वरित शाळा 15 जूनपासून; शिक्षण विभागाकडून निर्णयात बदल
Embed widget