Pune Crime news: प्रियकरासोबत झालेल्या वादातून पुण्यात 23 वर्षीय संगणक अभियंता असलेल्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide news) केल्याची घटना घडली आहे. खराडी (Kharadi news) परिसरात हा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार, या तरुणीने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय आहे. याप्रकरणी तिच्या प्रियकराविरुद्ध (Boyfriend) खराडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुलीच्या प्रियकराला अटक केली असून त्याची चौकशी सुरु आहे. या चौकशीतून आता कोणती नवीन माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. (Maharashtra Crime news)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जान्हवी पाठक (वय 23) असे या तरुणीचे नाव असून ती मूळची बिहार येथील आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास खराडी परिसरातील रिव्हर डेल सोसायटीत घडली. याप्रकरणी तरुणीच्या उत्तर प्रदेश येथे राहणाऱ्या 49 वर्षीय काकांनी खराडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार आरोपी अमृतकुमार अरुणकुमार सिंह (वय 23, मूळ रा. पहाडगंज, दिल्ली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही केली आहे. जान्हवी आणि तिच्या प्रियकरामध्ये नेमक्या कोणत्या कारणावरुन वाद झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या नात्यात कोणता तणाव होता, ज्यामुळे इतके कडाक्याचे भांडण होऊन जान्हवीने टोकाचा निर्णय घेतला, या सगळ्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
जान्हवी आणि अमृतकुमार हे दोघे आधीपासून एकमेकांच्या ओळखीचे असून त्यांचे शालेय शिक्षण एकत्र झालेले आहे. या दोघांचे प्रेमसंबंध होते. जान्हवीने राजस्थानमधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. ती खराडी परिसरातील एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून काम करत होती. तर आरोपी नोएडा येथील एका आयटी कंपनीत कार्यरत आहे. जान्हवी गेल्या दोन महिन्यांपासून पुण्यात राहत होती. आरोपी दोन दिवसांपूर्वी तिला भेटण्यासाठी नोएडा येथून पुण्यात आला होता. गुरुवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला. वादाचे पर्यवसान एकमेकांना मारहाण करण्यापर्यंत झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी अमृतकुमार खोलीच्या खाली उतरला. त्याचवेळी जान्हवीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी खराडी पोलिस अधिक तपास करत आहेत.
आणखी वाचा
