एक्स्प्लोर

Pune Drug Racket : पुण्यात जप्त केलेल्या 6 कोटींच्या ड्रग्स रॅकेटचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; नायजेरियातली बेनी मुख्य सूत्रधार, पोलीस तपासात धक्कादायक माहिती उघड

Pune Crime: पुण्यातील कात्रज परिसरातून तब्बल 5 कोटी 79 लाख रुपयांचे मेफेड्रॉन ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने हा अमली पदार्थ दिल्लीहून आणल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आलीय.

Pune Drug Racket Case News : पुण्यातील कात्रज परिसरातून तब्बल 5 कोटी 79 लाख रुपयांचे मेफेड्रॉन (एमडी) ड्रग्ज जप्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने (Pune Crime News) हा अमली पदार्थ दिल्लीहून आणल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आलीय. बेनी नावाच्या नायजेरियन महिलेच्या सांगण्यावरून हा ड्रग्जचा साठा बंगळुरूत पोहोचविण्यासाठी निघालेला असताना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने कात्रज येथे सापळा रचून त्याला पकडले. (Pune Drug Racket Case News)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत सुरेश सावंत (38) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी 2 किलो 895 ग्रॅम मेफेड्रॉन, एक मोबाईल आणि एक बॅग असा एकूण 5 कोटी 79 लाख 10 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर एमडी साठा जप्त केल्यावर हे प्रकरण एका मोठ्या नेटवर्कचे असल्याचा अंदाज येताच पोलिसांनी आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटची साखळी उलगडण्यासाठी आरोपीला दिल्ली येथे नेलं. तपासादरम्यान, आरोपी ने हे एमडी नायजेरियाच्या बेनी नामक महिलेने सांगितलेल्या पत्त्यावरून आणल्याचं निष्पन्न झालं आहे.

Pune Drug Racket Case: ही "बेनी" नेमकी आहे तरी कोण?

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने सावंत याच्याकडून जवळपास 6 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करताच हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय येताच आरोपिकडे कसून चौकशी करायला सुरुवात केली. आरोपी सावंत याची नायजेरियन महिला 'बेनी' हिच्याशी ओळख होती. बेनी सावंतशी मोबाईल वरून संपर्क साधायची आणि अमली पदार्थ कोणाकडून घ्यायचे आणि कोणाला द्यायचे याच्या सूचना करत असे. काही दिवसांपूर्वी मूळ पुण्यातील येरवडा भागातील राहणारा सावंतला बेनीचा फोन आला. 'दिल्लीला जायचं, सांगेल त्या ठिकाणी एक बॅग असेल ती उचलायची आणि बंगलोरमध्ये जाऊन द्यायची आहे' अशा सूचना दिल्या. त्यानुसार सावंत दिल्लीत पोहचला, त्याला मोबाईल वर एक पत्ता आला. एका जंगल सारख्या निर्मनुष्य ठिकाणी तो पोहचला, तिथे असलेली बॅग उचलली आणि निमूटपणे निघाला.

बेनी ने दिलेल्या सूचनांनुसार ती बॅग त्याला बंगळुरू मध्ये द्यायची होती. दिल्लीवरून बंगलोर ची बस न घेता त्याने पुण्याची बस पकडली. पुण्यातील कात्रज भागात बस थांबली, खाली उतरताच सावंतचे पोलिसांनी 'स्वागत' केलं आणि थेट कोठडीत नेलं.

Pune Crime News: गोल्फ कोर्सचा हमाल ते अमली पदार्थांचा दलाल

सावंत हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बंगळुरू सह पुण्यातील विश्रांतवाडी, विमानतळ, येरवडा यासारख्या पोलिस ठाण्यात एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. अमली पदार्थांची तस्करी करण्यापूर्वी सावंत "कॅडी" म्हणजेच गोल्फ कोर्स मध्ये हमाल म्हणून काम करत होता. गोल्फरच्या बॅग, क्लब आणि इतर साहित्य एका होलवरून दुसऱ्या होलवर घेऊन जाणे हे सावंत चे प्रमुख कामे असे. मात्र ही नोकरी सोडून त्याने अमली पदार्थांची तस्करी करायला सुरुवात केली.

इतर महत्वाच्या बातम्या 

गेल्या दहा वर्षांपासून एबीपी माझा मध्ये कार्यरत. पुण्यासह दिल्ली पंजाब आणि गुवाहाटी मध्ये काम करण्याची संधी मिळाल्यामुळे कृतज्ञ. वार्तांकन व्यतिरिक्त पर्यटनाचा छंद...
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
धक्कादायक! चार जणांच्या टोळक्यानं युवकाला जागीच संपवलं, नांदेडच्या ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीतच घडली घटना
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
Advertisement

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget