Pune Crime news : मागील काही दिवसांपासून (Pune crime) पुण्यात गुन्हेगारीत वाढ झाली आहे. किळसवाणे प्रकार आणि कौटुंबिक हिंसाचारातदेखील वाढ झाल्याचं मागील काही दिवसांमध्ये घडलेल्या घटनांमधून समोर आलंं आहे. अशीच एक संतापजनक घटना पुण्यातून समोर आली आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला गरम हिटरने चटके दिले आहेत. पुण्यातील कोंढवा भागातून ही धक्कादायक घटना आली समोर आली आहे. या प्रकरणी 40 वर्षीय नराधमाला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारित्र्याच्या संशयावरुन फक्त हिटरचे चटकेच दिले नाही तर हात पाय बांधलेल्या अवस्थेत असताना पत्नीसोबत अतिशय क्रूररित्या शारीरिक संबंध ठेवले. 35 वर्षीय पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर 40 वर्षीय आरोपी पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 30 एप्रिल रोजी हा प्रकार घडला.
नेमकं काय घडलं?
महिला त्यांच्या सोळा वर्षे मुलीचा मोबाईल पाहत होत्या. यावेळी आरोपी पतीने पत्नी कोणासोबत बोलत तर नाही ना? असा संशय घेऊन तिला हाताला धरून बेडरूममध्ये घेऊन गेला. पत्नी आणि त्यांची चार मुले या संपूर्ण प्रकाराने घाबरून गेली. आरोपीने दरवाजा बंद करून फिर्यादीच्या सलवार आणि ओढणीने त्यांचे हातपाय बेडला बांधले. त्यानंतर हिटर गरम करून फिर्यादीच्या गुप्तांगावर त्याचे चटके दिले. इतकेच नाही तर अतिशय क्रूररित्या त्याने पत्नी सोबत शरीर संबंध ठेवले.
मुलांसमोरच केलं अश्लील कृत्य
आरोपीने पत्नीसोबत अतिशय घृणास्पद कृत्य करत फिर्यादीच्या तोंडात स्वतःचा पाय घातला आणि अंगावर लघु शंका देखील केली. त्यानंतर पत्नीच्या हातापायावर आणि डोक्यावर खलबत्त्याने मारहाण केली. दरम्यान, मुली बाहेर जास्त आरडाओरडा करू लागल्याने आरोपीने दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्यानंतर आरोपीने 16 आणि 11 वर्षीय मुलीकडे पाहून देखील अश्लील कृत्य केलं. हा सगळा प्रकार पाहून मुलं हादरली.
कौटुंबीक हिंसाचारात वाढ
शहरात कौटुंबिक हिंसाचाराच्या अनेक घटना रोज समोर येत आहे. चारित्र्याचा संशय आणि अन्य कारणावरुन हे प्रकार घडत आहेत. पुण्यात मागील काही दिवसांपासून अशा अघोरी कृत्यांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. काहीच दिवसांपूर्वी अशीच अघोरी घटना समोर आली होती. जादूटोण्यासाठी महिलेचं मासिक पाळीतील रक्त सासरच्या मंडळींनी विकल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला होता. 27 वर्षीय पीडित महिलेने या प्रकरणी पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन पुणे पोलिसांनी पतीसह सासरच्या मंडळींनाही अटक केली होती.