इंदापूर : इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील एका 21 वर्षीय विवाहित महिलेने सासरच्या त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोनाली समाधान चंदनशिवे असं मृत महिलेचं (Pune Crime News) नाव आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी थेट इंदापूर पोलीस स्टेशन बाहेर मोठी गर्दी केली होती. मयत सोनाली चंदनशिवे हिचे वडिलांच्या तक्रारीवरून आरोपी पती समाधान उर्फ कार्तिक गौतम चंदनशिवे, सासरे गौतम नामदेव चंदनशिवे आणि सासू पार्वती गौतम चंदनशिवे या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात (Pune Crime News) आला आहे. इंदापूर पोलिसांनी तात्काळ मयत सोनाली हिचा पती समाधान उर्फ कार्तिक चंदनशिवे आणि सासरा गौतम चंदनशिवे दोघांना अटक केली आहे. मयत सोनाली चंदनशिवे ही साडेपाच महिन्याची गर्भवती होती, सातत्याने (Pune Crime News) तिला सासरी माहेरहून एक लाख रुपये हुंडा घेऊन ये यासाठी शारीरिक व मानसिक त्रास दिला जात होता, या त्रासाला कंटाळून काल सकाळी तिने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केले आहे असा आरोप मयत सोनालीचे वडील हनुमंत बनसोडे यांनी तक्रारीद्वारे केला आहे.(Pune Crime News)
या घटनेबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक विलास नाळे म्हणाले की, "इंदापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये वडापुरी गावामध्ये आज सकाळी सोनाली समाधान चंदनशिवे (वय २१), तिचं मूळ माहेर आहे, कनेर गाव, तालुका माढा. तिचं सासर आहे वडापुरी. तिच्या लग्नाला ११ महिने झालेले आहेत आणि ती ५ महिन्याची गरोदर आहे. मृत महिलेची सासू पार्वती गौतम चंदनशिवे, तसेच गौतम नामदेव चंदनशिवे (सासरे) आणि पती समाधान गौतम चंदनशिवे यांनी तिचा शारीरिक व मानसिक त्रास दिला, तसेच घरून १ लाख रुपये घेऊन ये हुंड्याच्या स्वरूपात, अशा स्वरूपाची तिच्याकडे वारंवार मागणी केली. या त्रासाला कंटाळून तिने आज तिच्या वडापुरी येथील राहत्या सासरी आत्महत्या केलेली आहे.(Pune Crime News)
सदर प्रकरणावरून इंदापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर ५४१/२६, BNS कलम ८०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आमच्याकडे दोन्ही आरोपी म्हणजे पीडितेचा नवरा आणि सासरे यांना आम्ही अटक केलेलं आहे. तसेच रात्रीची वेळ असल्यामुळे आम्ही तिच्या सासूला अटक करू शकलो नाही, तिच्यावर अटकेची कारवाई उद्या आम्ही करणार आहोत. एकंदरीत सदर गुन्ह्याचा तपास हा PSI कोल्हे करत आहेत. तपास सुरू आहे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई चालू आहे, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.(Pune Crime News)
Pune Crime News: वडगाव मावळात चिमुकलीवर अत्याचार; 51 वर्षीय आरोपीला अटक
वडगाव मावळातील टाकवे बुद्रुक येथे अवघ्या २ वर्षे १० महिन्यांच्या चिमुकलीसोबत लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी 51 वर्षीय नराधम बाळू नामदेव आसवले याला वडगाव मावळ पोलिसांनी अटक केली आहे. एका दूध डेअरीत ही घटना घडल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अटकेतील आरोपीला वडगाव न्यायालयाने ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत.
