Pune Crime news: भिगवणमध्ये आई-भावाच्या डोळ्यात चटणी फेकत तरुणीचं अपहरण, लग्न चार दिवसांवर, भिगवण बंदची हाक
मुलगी, आई आणि भाऊ गाडीवरून जात असताना दोन तरुणांनी आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकत मुलीचं अपहरण केलंय. या अपहरण करणाऱ्या नराधमास त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी आज भिगवण बंदची हाकही देण्यात आलीय.

Indapur Crime News : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे एक अतिशय खळबळजनक घटना घडली आहे. यात मुलगी, आई आणि भाऊ गाडीवरून जात असताना दोन तरुणांनी आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकत मुलीचं अपहरण (Crime News) केलंय. या धक्कादायक घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीच वातावरण आहे. तर या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. अपहरण करणाऱ्या नराधमास त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी आज भिगवण बंदची हाकही देण्यात आली आहे. (Pune Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यातील भिगवन येथे गाडीवरून जात असताना मुलीचे अपहरण करण्यात आलं. त्यानंतर इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील ग्रामस्थ संतप्त होऊन पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला होता. त्यानंतर काही काळ पुणे सोलापूर महामार्ग रोखून धरण्यात आला होता. आता वाहतूक सुरळीत झाली असली तरी आज भिगवण बंदची हाक देण्यात आलेली आहे. तसेच आरोपींना लवकरात लवकर पकडावं, या मागणीसाठी हिंदू जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या मोर्चाला आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप हजेरी लावणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे आता आरोपींना पकडण्याचे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे.
Indapur Crime News : अवघ्या 4 दिवसांवर लग्न, आरोपीच्या आणि मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी 6 पथके रवाना
दरम्यान, आरोपीच्या आणि मुलीच्या शोधासाठी पोलिसांनी 6 पथके रवाना केली आहेत. मात्र अद्यापही मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलेलं नसल्याने नागरिकांमध्ये रोष पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे अपहरण झालेल्या मुलीचे 22 फेब्रुवारीला म्हणजेच अवघ्या 4 दिवसांवर लग्न असताना हि घटना घडली आहे. परिणामी आज भिगवण बंदची हाक देण्यात आलेली आहे.
Indapur Crime : आरोपी मुलाचे घर शेजारीच, महिनाभरापासून फोनवर होत बोलणं
लग्नाची खरेदी करून घरी जात असताना भावाच्या आणि आईच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचा अपहरण करण्यात आलंय. तर अपहरण झालेल्या मुलीचे आणि मुलाचे घर शेजारीच असल्याची माहिती आहे. दोघांच्यात एक महिनाभरापासून फोनवर बोलणं होत होतं. तर मुलीचे वय 21 वर्ष असून मुलीच्या आणि आरोपीच्या तपासासाठी पोलिसांनी सहा पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी 165 किलोमीटरचा रूट मॅप केला आहे. यामध्ये कोणताही धार्मिक तेढ निर्माण होऊ नये याची देखील खबरदारी प्रत्येकाने घ्यावी, कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. जर कुणी अशा पद्धतीचे वर्तन केलं तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
























