राजगुरुनगर/पुणे : पुण्याच्या खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. बहिणीशी बोलत नसल्याच्या कारणातून माजी सैनिक असलेल्या पतीने पत्नीचा गळा आवळून (Pune Crime News) खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ४० वर्षीय दिपा महेंद्र दौंडकर यांचा गळा आवळून पतीनेच त्यांचा खून केला (Pune Crime News) असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर आईला उठवण्यासाठी बेडरूममध्ये गेलेल्या १७ वर्षीय मुलावरही हल्ला करण्यात आला आहे. मुलगा अर्थव याने दिलेल्या फिर्यादीनुसार, माजी सैनिक आरोपी वडील महेंद्र शिवाजी दौंडकर यांनी त्यालाही ओढणीने गळफास देण्याचा प्रयत्न केला. अर्थवने आरडाओरड करत घराबाहेर जाण्याचा प्रयत्न (Pune Crime News) केला असता, 'तुला चाकूने भोसकेन' अशी धमकी देत त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर चाकूने वार केले आहे. घटनेनंतर माजी सैनिक आरोपी पती महेंद्र दौंडकर फरार झाला असून, खेड पोलीस त्याचा शोध घेत आहेत.या घटनेमुळे राजगुरुनगर परिसरात खळबळ उडाली आहे.(Pune Crime News)

Continues below advertisement

Pune Crime News: बहिणीशी बोलत नसल्याचा वाद; पत्नी अन् मुलाच्या जीवावर उठला

बहिणीशी बोलत नसल्याच्या किरकोळ कारणावरून  माजी सैनिकाने आपल्या पत्नीचा गळा आवळून तिला संपवलं, ही घटना पाहणाऱ्या पोटच्या मुलाचाही चाकूने वार करून खून करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना (दि. ३०) रोजी रात्रीच्या सुमारास राजगुरुनगर येथील वाडा रोड परिसरात घडली आहे. दिपा महेंद्र दौंडकर (वय ४० असे खून झालेल्या महिलेचे नाव असून आरोपी महेंद्र शिवाजी दौंडकर (वय ४५, रा. संगम गार्डन, वाडा रोड,राजगुरुनगर, मूळ रा. कनेरसर, ता. खेड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Pune Crime News:  आईला उठवण्यासाठी मुलगा बेडरूममध्ये गेला...

मुलगा अथर्व महेंद्र दौंडकर (वय १७ ) याने दिलेल्या माहितीनुसार, रविवार दि. ३० ऑगस्ट रोजी रात्री ९.३०ते ११.३५ वाजण्याच्या दरम्यान राहत्या घरी ही घटना घडली. आरोपी महेंद्र दौंडकर याने पत्नी दिपा या आपल्या बहिणीशी बोलत नसल्याच्या रागातून त्यांचा गळा आवळून खून केला. आईला उठवण्यासाठी मुलगा बेडरूममध्ये गेला असता हा प्रकार उघडकीस आला. त्यावेळी आरोपीने मुलाचाही ओढणीने गळफास देऊन खून करण्याचा प्रयत्न केला. मुलाने आरडाओरड करत घराबाहेर पळण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने 'तुला चाकूने भोसकेन' अशी धमकी देत त्याच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर चाकूने वार केला. या प्रकरणी खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे. 

Continues below advertisement