Pune Crime News: पुण्यातील (Pune) कल्याणीनगर (Kalyani Nagar) परिसरात रस्त्याच्या कडेला फोनवर बोलत उभ्या असलेल्या व्यक्तीला ‘रागाने का पाहतोस?’ असे म्हणत जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडील 15 हजार रुपयांची रोकड लुटल्याचा प्रकार समोर आला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोन आरोपींनी ही जबरी चोरी केल्याची माहिती आहे. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाला होता. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी (Yerwada Police) तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली आहे. निखील ऊर्फ दाद्या शशिकांत कांबळे (वय 26) आणि अयान नासीर शेख (वय 22) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Continues below advertisement

Pune Crime News: फोनवर बोलत असताना दुचाकीवरून आले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 ऑगस्ट रोजी कल्याणीनगर परिसरात एक व्यक्ती रस्त्याच्या बाजूला उभा राहून फोनवर बोलत होती. त्याचवेळी दुचाकीवरून दोन अनोळखी व्यक्ती तेथे आले. या दोघांनी संबंधित व्यक्तीला ‘रागाने का पाहतोस?’ असे म्हणत वाद घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या खिशातील 15 हजार रुपये रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली आणि दोघेही दुचाकीवरून पसार झाले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे पीडित व्यक्ती घाबरली. त्याने येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

Pune Crime News: 87 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यासाठी घटनास्थळासह आजूबाजूच्या परिसरातील तब्बल 87 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. फुटेजच्या आधारे आरोपींच्या हालचालींचा माग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. यासोबतच पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून दोन्ही आरोपी हे हडपसर परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच दोघेही हडपसर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे तपासात समोर आले.

Continues below advertisement

Pune Crime News: गोपनीय माहितीच्या आधारे दोघांना अटक

आरोपींचा ठावठिकाणा समजल्यानंतर पोलिसांनी गोपनीय बातमीदारांच्या माध्यमातून अधिक माहिती मिळवली. त्यानंतर हडपसर पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे निखील ऊर्फ दाद्या शशिकांत कांबळे (वय 26) आणि अयान नासीर शेख (वय 22) अशी आहेत. पोलिसांनी दोघांकडे कल्याणीनगर परिसरातील जबरी चोरीबाबत चौकशी केली. चौकशीदरम्यान त्यांनी एका व्यक्तीला जीवे मारण्याची धमकी देऊन त्याच्या खिशातून 15 हजार रुपये रोख रक्कम चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलीस करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Chandrapur Crime News: शाळेच्या भिंतीवर मजकूर लिहिला, मुख्याध्यापकांची आई-वडिलांकडे तक्रार; चंद्रपूरमध्ये 14 वर्षीय विद्यार्थिनीनं उचललं टोकाचं पाऊल