एक्स्प्लोर

Pune Crime : मटका, क्रिकेटचे बेटिंग, पोकर गेम अन् बरेच काही! पुण्यात भर रस्त्यावर लघुशंका करणाऱ्या लेकाची आणि बापाची गुन्हेगारी हिस्ट्री समोर

Pune Crime News : पुण्यातील भर चौकात लघुशंका करणार्‍या आणि अश्लील चाळे करणार्‍या गौरव आहुजा आणि त्याचे वडील मनोज आहुजा या दोघांची पार्श्वभुमी गुन्हेगारी स्वरुपाची असल्याचे पुढे आले आहे.

पुणे: पुणे शहरात मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध चारचारी BMW गाडी उभी करून अश्लील चाळे करणाऱ्या तरुणाबाबत एक महत्वपूर्ण माहिती समोर आली आहे. पुण्यातील भर चौकात लघुशंका करणार्‍या आणि अश्लील चाळे करणार्‍या गौरव आहुजा (Gaurav Ahuja) आणि त्याचे वडील मनोज आहुजा (Manoj Ahuja) या दोघांची पार्श्वभुमी गुन्हेगारी (Pune Crime News) स्वरुपाची असल्याचे पुढे आले आहे. आहुजा बापलेक हे जुगाराच्या धंद्यात सक्रीय राहीलेले आहे.

शिवाय पोकर गेम, क्रिकेट सामन्यांचे बेटींग घेणे आणि मटक्याचा व्यवसाय चालवणं, अशा वेगवेगळ्या स्वरुपाचे जुगाराशी संबंधित धंदे आहुजा बाप लेक करत आले असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्यामुळे आहुजा बाप लेकांचे पाय आणखी खोलात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस (Pune Police) करत असून या प्रकरणी आता पोलीस नेमकी काय कारवाई करते, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आहुजा बाप-लेकाची पार्श्वभुमी गुन्हेगारी स्वरुपाची

पुढे आलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात मनोज आहुजा आणि त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकेसाठी पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, जुगाराच्या पैशातुन आहुजा बाप लेकांनी हॉटले व्यवसायात देखील गुंतवणुक केलीय. पुण्यातील स्वारगेट भागात आहुजा कुटुंबाच क्रीम एंड कीचन या नावाचं हॉटेल देखील आहे. गौरव आहुजाला दारुचे व्यसन तर आहेच, त्याचबरोबर तो आणखी कोणती नशा करतो का? याचाही पोलीस तपास करणार आहेत. येरवडा भागात अश्लील चाळे केल्यानंतर गौरव आहुजा त्याच्या मित्रासह फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेतायत.

क्रिकेटवर बेटींग घेणार्‍या टोळीचा सदस्य, अवघ्या 20 वर्षांचा गुन्हा

पोलिसांनी केलेल्या तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार, गौरव आहुजा आणि त्याचे वडील मनोज आहुजा या दोघांची पार्श्वभुमी गुन्हेगारी स्वरुपाची आहे. त्यातूनच गौरव आहुजावर जुगार आणि अपहरणाचा गुन्हा पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्यात 2021 ला दाखल करण्यात आलाय. गौरव आहुजा हा त्यावेळी अवघ्या 20 वर्षांचा होता. मात्र क्रिकेटवर बेटींग घेणार्‍या टोळीचा तो सदस्य होता. पुण्यातील नामचीन गुंड सचिन पोटेच्या नेतृत्वात ही टोळी क्रिकेट सामन्यांवर बेटींग घेत होती. कॉलेजमध्ये शिकणारे तरुण ही टोळी बेटींगच्या  सापळ्यात ओढत असे.

बेटींगच्या व्यसनामुळे अनेक कॉलेज तरुण कर्जबाजारी बनले होते. कर्ज फेडण्यासाठी या टोळीने त्या कॉलेज तरुणांना स्वतःच्या घरात चोरी करायला भाग पाडण्यात येत होतं. जे कॉलेज तरुण पैसे देत नव्हते त्यांच अपहरण करण्यात येत होतं. एका विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने गुन्हा नोंदवला असल्याची ही माहिती पुढे आली आहे.  

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन

व्हिडीओ

Mumbai congress Nagarsevak : BMC मध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक, कोणते मुद्दे घेऊन पालिकेत जाणार?
Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकेत महापौर, कशी असेल आरक्षण सोडत; चक्राकार पद्धत नेमकं काय?
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
Embed widget