Pune Crime News: भाऊ वहिनी नसताना तो घरात शिरला, तिच्या गळ्यावरून ब्लेड फिरवलं, प्रेमसंबंध अन् वादातून प्रियकराचं प्रेयसीसोबत क्रूर कृत्य
Pune Crime News: ब्लेडने गळ्यावर वार करून तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. जखमी तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

पुणे: प्रेम प्रकरणातून तरुणीवर प्राणघातक हल्ला (Pune Crime News) केल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. ब्लेडने गळा चिरून हत्या करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती आहे. चंदननगर परिसरातील पठारेवस्ती येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक अटक केली आहे. तर या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील चंदननगर परिसरात प्रेमप्रकरणातून एका २२ वर्षीय तरुणीवर प्राणघातक हल्ला (Pune Crime News) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ब्लेडने गळ्यावर वार करून तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. जखमी तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.(Pune Crime News)
Pune Crime News: गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू
उजालादेवी जसवंतसिंग दोहरे (वय २२) असे जखमी तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी दिलीप राठोड (वय २२) याच्याविरोधात चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी तरुणीचा भाऊ भगतसिंग जसवंतसिंग दोहरे (वय २५) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दिलीप राठोड आणि जखमी तरुणी एका मॉलमध्ये एकत्र काम करत होते. त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू होते. त्याच कारणातून आरोपी दिलीप हा पठारेवस्ती, चंदननगर येथील तरुणीच्या घरी आला. त्यावेळी तरुणी घरी एकटीच होती. तिचा भाऊ आणि वहिनी कामानिमित्त बाहेर गेले होते.(Pune Crime News)
Pune Crime News: मला खूप दुखापत झाली आहे. माझ्या गळ्यातून आवाज येत नाही
याच संधीचा फायदा घेत आरोपीने घरात घुसून तरुणीच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर जखमी अवस्थेत असतानाही तरुणीने आपल्या भावाला फोन करून, “लवकर घरी ये, एका मुलाने मला मारले आहे. मला खूप दुखापत झाली आहे. माझ्या गळ्यातून आवाज येत नाही,” अशी माहिती दिली. त्यानंतर तिने भावाला व्हिडीओ कॉल केला. त्यावेळी ती रक्तबंबाळ अवस्थेत दिसत होती.(Pune Crime News)
भावाने तातडीने घराकडे धाव घेतली. तोपर्यंत परिसरातील नागरिक आणि नातेवाईक घटनास्थळी जमा झाले होते. त्यांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. जखमी तरुणीला बोलता येत नसल्याने तिने इशाऱ्याने पेन आणि कागद मागवला व त्यावर “दिलीप राठोड” असे आरोपीचे नाव लिहून दिले. घरात घुसून तरुणीवर झालेल्या या प्राणघातक हल्ल्यामुळे चंदननगर परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास चंदननगर पोलीस करत आहेत.
Before You Go
Pune Hospital Bomb Case:यूट्यूब पाहून बनवला बॉम्ब;हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन,पोलिसांचा मोठा खुलासा!






















