Pune Crime: मदतीसाठी आलेल्या 'त्या 'तरुणीलाच पोलिसांनी अडकवलं; चौकीत सौदा केला अन्... पुन्हा बुधवार पेठेत पाठवलं; नेमकं काय घडलं?
Pune Crime News : पुण्यातील फरासखाना पोलीस (Pune Police) ठाण्यात घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे पोलिस (Pune Crime) दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Pune Crime News : पुण्यातील फरासखाना पोलीस (Pune Police) ठाण्यात एक धक्कादायक प्रकारा घडला आहे. या प्रकारामुळे पुणे पोलिसांच्या(Pune Crime) कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यात मदतीसाठी स्वतः पोलीस ठाण्यात आलेल्या एका बांगलादेशी तरुणीला (Bangladesh Women) पुन्हा जबरदस्तीने चक्क वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात दिल्याचा प्रकार घडलाय, असा आरोप (Pune Crime News) महिला पोलीस कर्मचाऱ्यावर झाला असून या प्रकरणी संबंधित महिला पोलीस हवालदाराला निलंबित करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे महिनाभरापूर्वी रात्रीच्या वेळी एक तरुणी फरासखाना पोलीस ठाण्यात आली होती. तिने कर्तव्यावर असलेल्या महिला पोलीस हवालदाराला आपण बांगलादेशी नागरिक असून बुधवार पेठ परिसरात आपल्याकडून जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती दिली. तसेच आपली सुटका करून मदत करण्याची विनंतीही तिने केली. पीडित तरुणीला पोलिसांनी मदत करणं आणि सत्य जाणून कारवाई करणं क्रमप्राप्त होतं. मात्र तसं न करता पोलिसांनी मदत करण्याऐवजी संबंधित महिला पोलीस हवालदाराने त्या तरुणीला बुधवार पेठेतील शुक्रवार पेठ पोलीस चौकीत नेले.
Pune Crime News : पोलीस कर्मचारी आणि कुंटणखाना मालकिणीमध्ये काही संशयास्पद बोलणी
दरम्यान, तेथे ती तरुणी ज्या कुंटणखान्यात काम करत होती त्या कुंटणखाना मालकिणीला बोलावण्यात आले. त्यानंतर महिला पोलीस कर्मचारी आणि कुंटणखाना मालकिणीमध्ये काही संशयास्पद बोलणी झाल्याचा आरोप आहे. या चर्चेनंतर मदतीची अपेक्षा ठेवून पोलिसांकडे आलेल्या तरुणीला पुन्हा त्या कुंटणखाना मालकिणीच्या ताब्यात देण्यात आल्याचे समोर आले आहे.
Pune Police : पोलिस विभागात खळबळ, महिला हवालदार निलंबित
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिस विभागात खळबळ उडाली. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असता कर्तव्यात गंभीर हलगर्जीपणा आणि बेजबाबदारपणा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर फरासखाना पोलिस ठाण्याच्या तपास पथकात नेमणुकीस असलेल्या महिला पोलिस हवालदार मनिषा पुकाळे यांना निलंबित करण्यात आले. परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावले यांनी ही कारवाई केली असून, “अत्यंत बेजबाबदारपणे कर्तव्य बजावून शिस्तप्रिय पोलिस दलाची प्रतिमा जनमानसात मलिन केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई करण्यात आली,” असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या

























