मावळ : वडगाव मावळातील टाकवे बुद्रुक येथे अवघ्या २ वर्षे १० महिन्यांच्या चिमुकलीसोबत लैंगिक अत्याचार  (Pune Crime News) करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी 51 वर्षीय नराधम  (Pune Crime News) बाळू नामदेव आसवले याला वडगाव मावळ पोलिसांनी  (Pune Crime News) अटक केली आहे. एका दूध डेअरीत ही घटना घडल्याचा आरोप पीडित मुलीच्या आईने केला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अटकेतील आरोपीला वडगाव न्यायालयाने ८ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत. (Pune Crime News)

Continues below advertisement

Pune Crime News: वडगाव मावळ पोलिसांनी ५१ वर्षीय संशयिताला अटक केली

तर या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने चिमुरडीला आईस्क्रीम खाण्याचं आमिष दाखवून दोन वर्षे १० महिन्यांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथे मंगळवारी (दि. १ सप्टेंबर) सकाळी ११ ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी ५१ वर्षीय संशयिताला अटक केली असून वडगाव मावळ येथील न्यायालयाने त्याला मंगळवारपर्यंत (दि. ८ सप्टेंबर) पोलिस कोठडी सुनावली आहे. बाळू नामदेव असवले (वय ५१, रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडित चिमुकलीच्या आईने याप्रकरणी गुरुवारी (दि. ३ सप्टेंबर) वडगाव मावळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. (Pune Crime News)

Pune Crime News: हा प्रकार चिमुकलीने तिच्या आईला सांगितला...

वडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयिताने चिमुकलीला दुकानातून आईस्क्रीम देण्याचं आमिष दाखवलं. त्यानंतर दुकानात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार चिमुकलीने तिच्या आईला सांगितला. त्यानंतर आईने पोलिसांकडे तक्रार केली. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत. पीडित चिमुकलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी नराधम आरोपीला तात्काळ गजाआड केले आहे. या घटनेमुळे मावळ परिसरात नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. (Pune Crime News)

Continues below advertisement

 

आणखी वाचा - Sharad Pawar on Vidyanand Bapat: पुण्यात डीजेविरोधात आवाज उठवल्याने विद्यानंद बापट यांना मारहाण; शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, कुणीतरी...