Pune Crime News: घरात घुसला, शारीरिक संबंध ठेवण्यासाठी महिलेला जखमी केले; पुढे जे केलं, सगळे हादरले, बारामतीमधील थरकाप उडवणारी घटना
Pune Crime News: पुण्याच्या बारामती तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Pune Crime News पुणे: महिलेसोबत शारीरिक संबंध करता यावेत म्हणून इसमाने घरात प्रवेश केला. महिलेला मारहाण केली आणि त्यानंतर महिलेने प्रतिकार केल्याने महिलेचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती तालुक्यात (Baramati Pune News) घडला आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पणदरे एमआयडीसी परिसरात एका गरोदर महिलेवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आला होता.
सदर घटनेनंतर केवळ दोन तासातच माळेगाव पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले आहे. वैशाली तानाजी पवार असं खून झालेल्या महिलेचे नाव असून आरोपी गणेश रामचंद्र माने वय 26 वर्ष राहणार पणदरे तालुका बारामती याला माळेगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी गणेश माने याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Pune Crime News)
बारामतीमध्ये नेमकं काय घडलं? (Pune Crime News)
मृत महिला वैशाली पवार हिच्यासोबत शारीरिक संबंध करता यावेत म्हणून तिला आरोपीने हातोड्याने मारहाण करून तिला जखमी केले. त्यानंतर जखमी अवस्थेतच तिच्यावर जबरदस्ती शारीरिक संबंध केले. यावेळी संबंधित पीडित महिला आरोपीला विरोध करत होती. आरोपीने केलेले कृत्य तिने कोणाला सांगू नये, यासाठी आरोपीने टॉवेलच्या साह्याने तिचा गळा आवळून तिचा खून केला. तिच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि पायातील पैंजण देखील आरोपी घेऊन गेला होता. सदर पीडित मृत महिलेच्या वैद्यकीय तपासणीचा प्राथमिक अहवाल माळेगाव पोलिसांना प्राप्त झाला असून यामध्ये ती गर्भवती असल्याचा समोर आलं आहे. शिवाय तिच्या डोक्यात मानेवर गंभीर जखमा असून तिच्या गुप्तांगात देखील जखमा असल्याचं वैद्यकीय तपासणीत समोर आलं आहे.
जालन्यातही हादरवणारी घटना- (Jalna Crime News)
जालना शहरातील रामनगरमध्ये चॉकलेटचे अमिष दाखवून सहा वर्षीय चिमुकली वरती अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 60 वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. दिनेश सुवर्णकार असे आरोपीचे नाव असून आरोपीने सहा वर्षाच्या चिमुकलीला चॉकलेटचं आमिष दाखवून घरामध्ये बोलवत तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीला अटक करत त्याच्यावर सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय दरम्यान भाजप नेते माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आरोपी ताब्यात देण्याची मागणी केली. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी हस्तक्षेप करत आरोपीला कडक कारवाईच आश्वासन दिल्याने संतप्त नागरिकांचा काहीसा तणाव निवळला.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:
संबंधित बातमी:





















