Pune Crime Nasrapur: भोर तालुक्यातील नसरापूर येथे अवघ्या साडेतीन वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. 1 मे रोजी ही घटना घडली होती. या घटनेचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटत असून मुलीवर अत्याचार (Rape Case) करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशी द्या, अशी आग्रही मागणी होत आहे. ही मुलगी शाळेला सुट्टी लागल्याने आपल्या आजीच्या गावी आली होती. त्यावेळी या नराधमाने चिमुरडीला गोठ्यात नेऊन तिच्यासोबत कुकर्म केले होते. या घटनेनंतर आरोपीला लगेच पकडण्यात आले होते. या प्रकरणात आरोपीवर लवकरात लवकर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडून (Pune Police) सध्या पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस काल मुलीच्या वडिलांना भेटले. त्यांनी मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवून घेतला. (Pune Crime news)

Continues below advertisement

मुलीच्या वडिलांनी पोलिसांना एक महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, माझी मुलगी लहान होती. तिला गाय, म्हैस आणि इतर प्राणी खूप आवडायचे. ती गावी असताना नराधमाने याच गोष्टीचा फायदा घेतला, असे मुलीच्या वडिलांनी सांगितले. मुलगी खेळत असताना नराधमाने वासरु दाखवण्याच्या बहाण्याने तिला गोठ्यात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. ही मुलगी आपल्या पालकांसह पुण्यात राहत होती. ती उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आपल्या आजोळी नसरापूर येथे गेली होती. 

Pune Crime Nasrapur: नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, अहवालात काय?

Continues below advertisement

नसरापूर येथील मुलीच्या लैंगिक अत्याचार करून तिचा खून करताना आरोपीने मुलीच्या तोंडात पायात घालण्याचा मोजा कोंबल्याचे तसेच छातीवर ओरखडे आणि व्रण उमटले असल्याचे शवविच्छेदन करताना निदर्शनास आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या चिमुरडीची किती निर्घृण हत्या करण्यात आली हे समजून आलं आहे. ससून रुग्णालय प्रशासनाने शवविच्छेदनाचा हा प्राथमिक अहवाल पुणे पोलिसांना दिला आहे. दरम्यान आरोपीची वैद्यकीय चाचणीही पूर्ण झाली असून त्याचाही अहवाल तयार असल्याचे समजते. आता या प्रकरणात पोलीस आणि सरकार किती जलदरित्या कारवाई करणरा, हे आगामी काळात बघावे लागेल.

आणखी वाचा

Pune Crime Nasrapur: मोठी बातमी: नसरापूरमधील मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट समोर, अंगावर काटा आणणारी माहिती, नराधमाने तोंडात....

Pune Nasrapur Bhor Crime: ठेचून मारा, अंत्यविधी झाला तरी मला कुणी सांगायला येऊ नका; नसरापूर प्रकरणातील आरोपीची पत्नी काय काय म्हणाली?