Pune Crime Nasrapur Case: आपणसर्वआजजो समाज म्हणून एकत्र जमलोयते फक्त माझ्या मुली करता नाही, तर आतापर्यंत ज्या सगळ्या पुण्यात घटना घडल्या त्यासाठी हा समाज एकत्र झालेला आहे. जिथे स्वातंत्रवीर सावकरांनी विदेशी कपड्यांची होळी केली, तिथे या लैंगिक अत्याचार (Pune Crime Nasrapur Case) करणाऱ्या नराधमांची होळी व्हावी, यासाठी मूक मोर्चाची सांगता केली आहे. असे नराधम दिसतील त्यांना तिथेच शिक्षा करायलाहवी, त्यामुळे असा प्रकार घडणार नाही. हा मोर्चा कोणाच्याही विरोधात नव्हता. समाज अजून जिवंत आहे. हे न्यायव्यवस्थेला दाखवून देण्यासाठी होता. आज आपण शांतता मोर्चा काढला. मात्र अशा मोर्चांनी हिंसेत वळन होऊ नये याची सरकारने काळजी घ्यावी, असेम्हणतपुण्याच्या नसरापूर अत्याचार प्रकरणातील (Nasrapur Case) पीडितचिमुकलीच्यावडिलांनीभाष्यकेलंआहे. .(Pune Crime Nasrapur Case)
Pune Crime Nasrapur Case: सरकार आणि प्रशासन अपेक्षा होती त्यापेक्षा उत्तम काम करतंय
माझ्या चिमुकलीला आणि इतर अत्याचार झालेल्या पिडीतांना लवकरात लवकर न्याय द्यावा. आरोपींना कठोर फाशीची शिक्षा करावी. असं मी निवेदन करतो. पुढे अशा घटना होऊ नये म्हणून कठोरात कठोर कायदा करावा, यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. पोलिस प्रशासन, सरकार खूप चांगलं सहकार्य करत आहे. पोलीस प्रशासन डे टू डे आम्हाला सगळी माहिती देत आहे. सरकार आणि प्रशासन माझी जी अपेक्षा होती त्यापेक्षा उत्तम काम करतायत. 11 तारखेला चार्चशीट दाखल होईल, असं पोलिसांनी मला निवेदन दिलेलं आहे. असेहीतेम्हणाले.
पुण्यातील भोर तालुक्यातील नसरापूर अत्याचार प्रकरणाने (Nasrapur Case) संपूर्ण महाराष्ट्र हादरला. साडे तीन वर्षांच्या चिमुरडीवर 65 वर्षीय नराधमाने अत्याचार करत तिला संपवलं. या घटनेनंतर संपूर्ण राज्यभरातून संतापाची लाट उसळली. 'त्या नराधमाला लोकांच्या ताब्यात द्या, फाशी द्या' अशी मागणी करत संतप्त नागरिकांनी आंदोलनही केलंत्यावेळीतेबोलतहोते.
Nasrapur Girl Death : नेमकं काय घडलं?
पुण्यातील नसरापूर येथे 1 मे रोजी एक धक्कादायक घटना घडली. एका 65 वर्षीय व्यक्तीने, घरासमोर खेळणाऱ्या चिमुकलीला गोठ्यात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नंतर दगडाने ठेचून तिला निर्घृणपणे संपवलं आणि नंतर तिचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली झाकून ठेवला. दुपारी चिमुकली न दिसल्यानं तीची शोधाशोध केल्यानंतर चिमुकली गोठ्यात मृत अवस्थेत आढळली. त्यानंतर परिसरातले सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आरोपी चिमुकलीला गोठ्याच्या दिशेने घेऊन जाताना दिसला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
नराधम आरोपीने वासरू दाखवतो म्हणून हात धरून त्या चिमुकलीला गोठ्यात नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. आजीकडे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आलेल्या या मुलीच्या कुटुंबीयांनी आपल्याच मुली सोबत असं कधी घडेल असा विचारही केला नव्हता. मात्र दुपारी साडेतीन वाजताचे ते सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आणि अख्खं कुटुंब हादरलं. या घटनेनंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त करत पोलिसांना घेराव घातला.
इतकं गंभीर कृत्य करूनही या नराधमाला त्याचा जराही पश्चाताप झालेला नाही. ग्रामस्थांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. तरीही आपण काहीही चुकीचं केलेलं नाही, असा दावा या नराधमाने कोर्टात केला. शनिवारी पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केलं. यावेळी युक्तिवादही नराधमाच्या समोरच झाला. मग न्यायाधीशांनी या नराधमाला प्रश्न विचारला, तुमची केस नेमकी काय आहे माहिती आहे का? त्यावर या नराधमाने अक्षरश: संताप येईल, असं उत्तर दिलं. ही मारामारीची किरकोळ केस आहे, असं हा असूर कोर्टात म्हणाला.
या प्रकरणातील नराधमाला कोर्टाने 5 दिवसांची कोठडी सुनावणी आहे. मात्र, या नराधमाने केलंलं हे पहिलं नाहीतर तिसरं कृत्य आहे. याआधी पुरावे नसल्यानं तो दोन वेळा निर्दोष सुटला. त्यामुळे किमान या प्रकरणात तरी त्याला कठोर शिक्षा व्हावी, अशी प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
