पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात तसेच आणखी एक प्रकरण घडलं आहे. पुण्यातील आंबेगाव बुद्रुक परिसरात 31 वर्षीय महिलेने सहा वर्षीय चिमुरड्यासह इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. आंबेगाव बुद्रुकमधील कल्पक सोसायटीत घडलेल्या या प्रकारानंतर खळबळ उडाली आहे. मयुरी देशमुख असे आत्मह्तया केलेल्या महिलेचे नाव आहे.

Mayuri Deshmukh Suicide Case : चिठ्ठी लिहून आरोप

मयुरी देखमुखने आत्महत्या करण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली असून त्यामध्ये नणंदेच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवत असल्याचं म्हटलं आहे. मयुरी देशमुखने स्वतःच्या सहा महिन्यांच्या चिमुरड्याला घेऊन पाचव्या मजल्यावरुन खाली उडी मारली. यामध्ये त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. 

घटनेची माहिती मिळताच आंबेगाव बुद्रुक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांचेही मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले. पण तोपर्यंत त्या दोघांचाही मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं. 

Beed Suresh Jadhav Suicide : बँकेत ठेवलेले पैसे बुडाले, बीडमध्ये आत्महत्या 

बीडच्या गेवराई तालुक्यातील खळेगावात धक्कादायक प्रकार समोर आला. ठेवीदार सुरेश आत्माराम जाधव यांनी छत्रपती मल्टीस्टेट बँकेच्या गेटला गळफास घेऊन आत्महत्या केली. जाधव यांच्या छत्रपती मल्टीस्टेट बँकेत 11 लाख आणि ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये 5 लाख रुपये अडकले होते. 

मुलीच्या लग्नासाठी पैशांची गरज होती. मात्र सतत बँकेच्या फेऱ्या मारूनही त्यांना रक्कम परत मिळाली नाही. या मानसिक त्रासामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. मंगळवारी रात्री उशिरा कुटुंबासह बँकेत गेलेले जाधव, काही वेळातच बँकेच्या गेटवर मृत अवस्थेत आढळले. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मल्टीस्टेट बँकांची विश्वासार्हता पुन्हा एकदा समोर आली आहे.

ही बातमी वाचा: