Crime News: देवदर्शनासाठी गेलेल्या गुहागरच्या लोणावळ्यात खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गाडी वळवण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हाणामारीत झाले आणि यात कमलेश तानाजी धोपावकर (वय 45) या गुहागर तालुक्यातील तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना 25 मे रोजी रात्री घडली असून, या प्रकरणी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. (Pune Crime News)
नक्की घडले काय?
लोणावळ्यात फिरायला गेलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरमधील एक गाडी वळवण्यावरून झालेल्या वादातून स्थानिक तरुणांनी खून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रविवार मे रोजी रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर नऊ जणांना अटक करण्यात आली असून या हाणामारीत दोघे गंभीर जखमी झाले आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, कमलेश तानाजी धोपावकर (वय 45 ) रा. अडुर, कोंडकारुल, गुहागर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या खून प्रकरणी नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात येवून त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
गुहागरमधून कमलेश धोपावकर हे लोणावळ्यातील एकवीरा देवीचे दर्शनासाठी गेले होते. लोणावळ्याजवळील एका फार्म हाऊसजवळ गाडी वळवत असताना स्थानिक तरुणांच्या टोळक्याने त्यांच्याशी हुज्जत घालून हाणामारीला सुरुवात केली.याच झालेल्या मारामारीतून कमलेश धोपावकर यांचा खून करण्यात आला. याठिकाणी पोलीस दाखल होवून दोन स्थानिक तरुणांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील अन्य फरार झाले आहेत. त्यांचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन अधिक तपास करीत आहेत.
गाडी वळवण्याच्या वादातून स्थानिक तरुणांनी संपवले
कमलेश धोपावकर हे गुहागर तालुक्यातील अडुर, कोंडकारुल येथील रहिवासी होते. ते आपल्या काही मित्रांसह लोणावळ्यातील एकवीरा देवीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन आटोपून ते परत जात असताना, लोणावळ्याजवळील एका फार्महाऊसच्या परिसरात गाडी वळवण्यावरून त्यांचा स्थानिक तरुणांच्या टोळक्याशी वाद झाला. वाद वाढत गेला आणि त्याने हाणामारीचे रूप घेतले. या हाणामारीत कमलेश धोपावकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेल्या आणखी दोन मित्रांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपी फरार झाले आहेत. या सर्वांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींवरून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे लोणावळा परिसरात खळबळ उडाली असून, देवदर्शनासाठी आलेल्या व्यक्तीचा अशा प्रकारे खून होणे ही धक्कादायक घटना समोर आल्याने पोलीस प्रशासनाने या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
हेही वाचा: