एक्स्प्लोर

Pune VIDEO : मोठी बातमी : क्लास वन महिला अधिकाऱ्याचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ शूट, अधिकारी पतीनेच घरात स्पाय कॅमेरे लावले, पुणे हादरलं!

Pune Spy Camera Video : स्वतःच्या क्लास वन अधिकारी असलेल्या पत्नीचे आंघोळीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून घर-गाडीच्या हफ्त्यासाठी दीड लाख रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पुणे : राज्यात अधिकारी-राजकारण्याच्या हनी ट्रॅपचा मुद्दा गाजत असतानाच पुण्यात असाच एक वेगळाच प्रकार घडला आहे. आपल्या अधिकारी असलेल्या पत्नीवर नजर ठेवण्यासाठी क्लास वन अधिकाऱ्याने घरातच स्पाय कॅमेरा बसवला. त्या माध्यमातून पत्नीच्या आंघोळीचा व्हिडीओ काढून तिला ब्लॅकमेल करत असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पत्नीने त्या क्लास वन अधिकाऱ्यासोबत सासरच्या सात जणांवर आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आंघोळीचे हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तो अधिकारी त्याच्या पत्नीकडून माहेरून गाडी आणि कारच्या हप्त्याकरिता दीड लाख रुपये आणण्यासाठी जबरदस्ती करत होता या प्रकरणी 30 वर्षीय क्लास वन ऑफिसर असलेल्या पत्नीने आंबेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पतीसह सासरच्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात सासू, सासरे, दीर आणि इतर नातेवाईकांचा समावेश आहे.

Pune Spy Camera Video : पत्नीवर नजर ठेवण्यासाठी स्पाय कॅमेरा

सन 2020 मध्ये पीडितेचे लग्न झालं होतं. त्यानंतर त्यांचा संसार सुखाचा सुरु होता. मात्र काही वर्षात पतीला पत्नीवर संशय आला. त्याने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. वारंवार पैशासाठी त्रास देत होता. सोबतच तिच्यावर नजर ठेवण्यासाठी स्पाय कॅमेरेदेखील घरात बसवून घेतले होते.

त्या अधिकाऱ्याला आपल्या पत्नीवर संशय होता. त्यामुळे त्याने घरात स्पाय कॅमेरे लावले होते. ऑफिसमध्ये गेल्यावर तो अधिकारी त्याच्या क्लास वन ऑफिसर असलेल्या पत्नीवर नजर ठेवायचा. त्यानंतर त्या अधिकाऱ्याने स्वतःच्या बाथरूममध्येही स्पाय कॅमेरे लावले. त्या माध्यमातून पत्नीचे आंघोळीचे व्हिडीओ त्याने रेकॉर्ड केल्याचं समोर आलं.

व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

आंघोळीचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्याने पत्नीला दिली. गाडी आणि घराच्या हफ्त्यासाठी दीड लाख रुपये माहेरून आणण्यासाठीही त्याने जबरदस्ती केली. हा अधिकारी त्याच्या पत्नीला ब्लॅकमेल करत होता.

आपल्याला पतीकडून मानसिक आणि शारिरीक छळ होत असल्याचा आरोप करत त्या पत्नीने पोलिसात धाव घेतली आहे. यामध्ये स्पाय कॅमेराच्या व्हिडीओंचीही तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

ही बातमी वाचा:

शिवानी पांढरे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Election 2026: 'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray: प्रचंड खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं; खुर्च्यांचा प्रचंड प्रतिसाद होता, उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मोकळ्या खुर्च्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून डिवचलं
प्रचंड खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं; खुर्च्यांचा प्रचंड प्रतिसाद होता, उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मोकळ्या खुर्च्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून डिवचलं
तोपर्यंत बिनविरोध नगरसेवकांवर स्थगिती कायम ठेवावी; अविनाश जाधवांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी
तोपर्यंत बिनविरोध नगरसेवकांवर स्थगिती कायम ठेवावी; अविनाश जाधवांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी
Ajit Pawar Pune Metro: पुणे मेट्रो मोफत करण्यावरुन फडणवीसांनी खिल्ली उडवली, अजितदादांनी प्लॅनच सांगितला
पुणे मेट्रो मोफत करण्यावरुन फडणवीसांनी खिल्ली उडवली, अजितदादांनी प्लॅनच सांगितला

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Election 2026: 'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
'आप'च्या उमेदवारावर रोखलेली 'ती' बंदूक नव्हे तर लायटर; परस्पर विरोधी गुन्हा दाखल, नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray: प्रचंड खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं; खुर्च्यांचा प्रचंड प्रतिसाद होता, उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मोकळ्या खुर्च्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून डिवचलं
प्रचंड खुर्च्यांसमोर मुख्यमंत्र्यांनी संबोधित केलं; खुर्च्यांचा प्रचंड प्रतिसाद होता, उद्धव ठाकरेंनी भाजपच्या मोकळ्या खुर्च्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून डिवचलं
तोपर्यंत बिनविरोध नगरसेवकांवर स्थगिती कायम ठेवावी; अविनाश जाधवांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी
तोपर्यंत बिनविरोध नगरसेवकांवर स्थगिती कायम ठेवावी; अविनाश जाधवांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या तातडीची सुनावणी
Ajit Pawar Pune Metro: पुणे मेट्रो मोफत करण्यावरुन फडणवीसांनी खिल्ली उडवली, अजितदादांनी प्लॅनच सांगितला
पुणे मेट्रो मोफत करण्यावरुन फडणवीसांनी खिल्ली उडवली, अजितदादांनी प्लॅनच सांगितला
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी अदानींचा वकिल नाही, पण...; राज ठाकरेंचा पुन्हा पलटवार, एकच उद्योगपती एवढा मोठा कसा?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी अदानींचा वकिल नाही, पण...; राज ठाकरेंचा पुन्हा पलटवार, एकच उद्योगपती एवढा मोठा कसा?
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार सतेज पाटलांचा व्हिडिओ बॉम्ब; मतदानापूर्वी कोल्हापूरच्या सत्ताधारी आमदाराने 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ जारी
प्रचाराच्या शेवटच्या दिवशी आमदार सतेज पाटलांचा व्हिडिओ बॉम्ब; मतदानापूर्वी कोल्हापूरच्या सत्ताधारी आमदाराने 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ जारी
अभिनेत्री किशोरी शहाणेच्या कारला धडक; ठाणे-मुंबई मार्गावर नेमकं काय घडलं? VIDEO शेअर करत संताप व्यक्त
अभिनेत्री किशोरी शहाणेच्या कारला धडक; ठाणे-मुंबई मार्गावर नेमकं काय घडलं? VIDEO शेअर करत संताप व्यक्त
लाडक्या बहिणींनो बँक खातं चेक करा, संक्रांतीआधीच पैसे जमा झाले; आचारसंहितेच्या कात्रीतून सुटका
लाडक्या बहिणींनो बँक खातं चेक करा, संक्रांतीआधीच पैसे जमा झाले; आचारसंहितेच्या कात्रीतून सुटका
Embed widget