Crime: पुण्यातील अंबरनाथमध्ये फसवणूकीचा (fraud) एक गंभीर प्रकार घडला आहे. कॅब चालकानं बनावट फोनपेच्या माध्यमातून शहरातील अनेक सीएनजी पंपांवर फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.या कॅब चालकाने पेटीएमचा क्यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठवल्याचं पंपावरील कर्मचाऱ्यांना दाखवलं. मात्र हे पैसे पंपचालकाला न मिळाल्यामुळे त्याने चालकाला पकडून त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता हे फोन पे ॲपच बनावट असल्याचं उघड झालं.


हा कॅब चालक पेटीएम, फोनपेचा क्यूआर कोड स्कॅन करून पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट दाखवायचा आणि निघून जायचा. हे कर्मचाऱ्यांना कळेपर्यंत तो पंपावरून निघून जायचा. अशी  अनेक पंपांवर त्यांने फसवणूक केली असून या कॅबचालकाला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.


नक्की प्रकरण काय?


अंबरनाथच्या म्हाडा कॉलनी परिसरात महानगर गॅसचा सीएनजी पंप आहे. या पंपावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास एक कॅब चालक गॅस भरण्यासाठी आला. गॅस भरून झाल्यावर त्याने क्यूआर कोड स्कॅन करत पंपावरील कर्मचाऱ्यांना फोन पे ॲपचा स्क्रीन शॉट दाखवला, ज्यात पैसे गेल्याचं दिसत होतं. याच चालकाने रविवारी देखील असाच प्रकार करून पंपावरील कर्मचाऱ्यांची फसवणूक केली होती. ही बाब पंपावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येईपर्यंत कॅब चालक इथून निघून गेला होता. अशा प्रकरणात कर्मचाऱ्यांना आपल्या खिशातून पैसे भरावे लागत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी या कॅबचा नंबर लक्षात ठेवला होता. 


कर्मचाऱ्यांनी दिलं पोलिसांच्या ताब्यात


दुसरीकडे आपली चोरी पकडली गेली नाही, या अविर्भावात हा कॅब चालक सोमवारी सायंकाळी पुन्हा एकदा गॅस भरण्यासाठी त्याच पंपावर आला. यावेळी मात्र त्याच्यावर नजर ठेवून असलेल्या कर्मचाऱ्यांनी त्याने क्यूआर कोड स्कॅन करताच पंपावरील मोबाईल चेक केला, मात्र त्यात पैसे आल्याची एन्ट्री दिसून न आल्यामुळे त्यांनी त्वरित या कॅबच्या चालकाला पकडलं आणि पोलिसांना पाचारण केलं. पोलिसांनी या कॅब चालकाच्या मोबाईलची झाडाझडती घेतली असता त्यामध्ये फोन पे चं ॲपच बनावट असल्याचं उघड झालं. यावेळी कॅब चालकाने आपली चूक मान्य करत ती फसवणूक कशी केली, याचा लाईव्ह डेमो सुद्धा दाखवला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी या कॅब चालकाला ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेलं असून पुढील कारवाई सुरू करण्यात आलीय.


हेही वाचा:


Indapur : इंदापुरात गोळीबार, भर रस्त्यावर तीन राऊंड फायर, एकजण गंभीर जखमी; कायद्याची 'ऐसी की तैसी' सुरूच