एक्स्प्लोर

Pune Crime News: दीड वर्षांचा असताना वडिलांचा मृत्यू; मारेकरी जामिनावर बाहेर येताच मुलगा सूडाने पेटला, कात्रज बोगद्यात 28 वार करुन खेळ संपवला, पोलिसांनी सांगितली ए टू झेड स्टोरी

Pune Crime News: पोलिसांनी मंथन वैद्य आणि सौरभ परदेशी यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी मिजान शेख आणि संदीप कोरी यांच्या मदतीने ही हत्या केल्याची कबुली दिली.

पुणे: ११ जुलै रोजी पुणे-सातारा महामार्गावरील जुन्या कात्रज बोगद्याजवळ शिंदेवाडी परिसरात संजय देशमुख (Pune Crime News)यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची हत्या करण्यात (Pune Crime News) आली होती. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि राजगड पोलिसांनी या प्रकरणाचा संयुक्त (Pune Crime News)तपास सुरू केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी मंथन वैद्य आणि सौरभ परदेशी यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत त्यांनी मिजान शेख आणि संदीप कोरी यांच्या मदतीने ही हत्या केल्याची कबुली दिली. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.(Pune Crime News)

Pune Crime News: २३ वर्षांनंतर वडिलांच्या हत्येचा बदला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी राजगड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कात्रज बोगदा संपल्यानंतर मयत संजय देशमुख यांच्यावर तब्बल २८ वार करून त्यांचा खून करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर अधिक तपासात एकूण चार आरोपी निष्पन्न झाले. यामध्ये मुख्य आरोपी मंथन दिनेश वैद्य (वय २५) आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक करण्यात आली. मुलाने आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला जवळपास २३ वर्षांनंतर घेतला. तब्बल २३ वर्षे त्याच्या मनात हा राग धगधगत होता. त्यातूनच त्याने अत्यंत नियोजनबद्ध रीतीने हा प्लॅन आखून वडिलांच्या हत्येचा बदला घेतला.(Pune Crime News)

Pune Crime News: २००३ मधील हत्येची पार्श्वभूमी

गुन्ह्याचे मूळ कारण शोधले असता, मुख्य आरोपी मंथन वैद्य हा दीड वर्षाचा असताना, २००३ मध्ये विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याच्या वडिलांचा खून झाला होता. त्या खुनाच्या प्रकरणात संजय देशमुख हा आरोपी होता आणि तो साडेतीन वर्षे जेलमध्ये राहिला होता. त्यानंतर तो जामिनावर सुटला होता.संजय देशमुख हा सराईत गुन्हेगार होता. वडिलांच्या हत्येतील आरोपीला योग्य शिक्षा झाली नाही, याच रागातून मंथन वैद्य याने साथीदारांच्या मदतीने हा कट रचून संजय देशमुख यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण चार आरोपींना अटक करण्यात आली असून, हत्येमागे आणखी काही कारण आहे का, याचा अधिक तपास राजगड पोलीस करत आहेत.

Pune Crime News:  वडिलांच्या खुनाचा बदला; चौघांना अटक

पुणे-सातारा महामार्गावरील जुन्या कात्रज बोगद्याजवळील शिंदेवाडी परिसरात झालेल्या खूनप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी चौघांना अटक केली. मृताचे नाव संजय बाबूराव कडू-देशमुख (वय ४०, रा. मुंढवा, मूळ रा. कुरण, ता. वेल्हे) असे आहे. तर अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे मंथन दिनेश वैद्य, सौरभ सागर परदेशी, मिझान गौसउद्दीन शेख, संदीप बाबुलाल कोरी अशी आहेत.

Pune Crime News: नेमकं काय घडलं?

११ जुलै रोजी शिंदेवाडी परिसरात संजय देशमुख यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून करण्यात आला होता. या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि राजगड पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला. तपासादरम्यान मंथन वैद्य आणि सौरभ परदेशी यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी मिझान शेख आणि संदीप कोरी यांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. तपासात आरोपींकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पोलिसांच्या तपासानुसार, मंथन वैद्यच्या वडिलांचा खून संजय देशमुख यांनी केला होता. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मंथनने साथीदारांच्या मदतीने संजय देशमुख यांची हत्या केल्याची कबुली दिली.(Pune Crime News)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Baramati Crime News: आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
आई...अथर्वला माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचेत; तरुणीचा आईला फोन आणि काही तासांत मृत्यू; आता मैत्रिणीने सांगितली अंगावर काटा आणणारी माहिती
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून नैराश्य, 30 वर्षीय युवकाने उचलले टोकाचे पाऊल; चिठ्ठीतील 'ते' शब्द मन हेलावणारे
Pune Baramati Crime News: अथर्वला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना
अथर्वला शारीरिक संबंध ठेवायचेत, मला गोळी देतोय; मुलीचा आईला फोन, पुढच्या तासांत युवतीचा मृत्यू, बारामतीमधील हादरवून सोडणारी घटना
Pune Crime News: वडापाव खाताना चुकून पायाला पाय लागला, संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
वडापाव खाताना चुकून पायाला पाय लागला, संतापलेल्या वैभवने शिवमच्या छातीवर बुक्क्या मारल्या अन्...; पुण्यातील हादरवणारी घटना
Advertisement

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget