पुणे : पुण्यातील बुधवार पेठेत (Pune Budhwar Peth) बुधवारी मध्यरात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत पुणे पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि तब्बल 41 बिल्डिंगची झाडाझडती घेतली. यामध्ये 700 जणांची चौकशी करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच या कारवाईत दोन बांगलादेशी महिला तसेच काही अल्पवयीन मुलींची सुटका करण्यात यश आलं. झडती घेतलेल्या काही जणांकडून 7 ग्रॅम चरस तसेच अमली पदार्थांचे इंजेक्शन जप्त करण्यात आलं आहे. हे अमली पदार्थ आणि इंजेक्शन नेमकं कुठून आणले गेले होते, याचे पेडलर कोण आहेत याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
वेश्यावस्तीत बेकायदा वास्तव्य करणाऱ्या एका बांगलादेशी तरुणीवर कारवाई न करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित केल्यानंतर पोलिसांनी ही मोठी मोहीम हाती घेतली. बुधवार पेठेत येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली. शुक्रवार पेठ पोलीस चौकी जवळ असलेल्या सर्व कुंटणखान्यातील महिलांची महिला पोलिसांनी चौकशी केली. तसेच या ठिकाणी वावरत असलेल्या अनेक तरुणांची पोलिसांनी झाडाझडती घेतली.
700 जणांची झाडाझडती
अंमली पदार्थ तसेच जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करायला भाग पाडणे, बांगलादेशी महिलांचे बेकायदा वास्तव्य या अनुषंगाने पोलिसांनी अनेक संशयितांची चौकशी केली. या ऑपरेशन मध्ये 600 पेक्षा अधिक पोलीस अधिकारी कर्मचारी सहभागी होते. मध्यरात्री 12 वाजता सुरू झालेल्या या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये बुधवार पेठेतील 41 बिल्डिंग तपासल्या, गेल्या तसेच 700 लोकांची झडती घेण्यात आल्याची माहिती पुणे पोलिसांनी पत्रकार परिषदेतून दिली.
स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेच्या विविध युनिटचे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा रात्री 12 वाजता बुधवार पेठेत दाखल झाला. बुधवार पेठेत येणारे आणि जाणारे सर्व रस्ते नाकाबंदी करून पोलिसांनी बंद केले आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
ही बातमी वाचा :
