Pune Bhor Crime: पुणे (Pune) जिल्ह्याच्या भोर (Bhor) तालुक्यातील नसरापूर येथे 4 वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिला संपवण्यात आल्याची घटना 1 मे रोजी घडली. या प्रकरणातील नराधम आरोपीला पुणे न्यायालयाने 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांच्यासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी आरोपीने स्वतःला वाचवण्यासाठी न्यायालयात एक धक्कादायक बनाव रचला, मात्र पोलिसांनी कडक युक्तिवाद केल्यानंतर त्याचा पोलीस कोठडी सुनावण्यात आली. 

Continues below advertisement

Pune Bhor Crime: आरोपीचा कोर्टातील बनाव

पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर, "काही तक्रार आहे का?" असे न्यायाधीशांनी विचारले. यावर आरोपीने अत्यंत निर्लज्जपणे उत्तर देत, "किरकोळ भांडणातून मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे," असा बचाव केला. मात्र, पोलिसांनी सादर केलेले प्राथमिक पुरावे आणि घटनेचे गांभीर्य लक्षात घेता त्याचा हा दावा फोल ठरला.

Pune Bhor Crime: पोलिसांचा युक्तिवाद  

तपास अधिकारी विजयमाला पवार आणि विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रह्मे यांनी न्यायालयात आरोपीच्या कोठडीची मागणी करताना महत्त्वाचे मुद्दे मांडले. आरोपीने चिमुकल्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे, त्या अनुषंगाने त्याची वैद्यकीय तपासणी, रासायनिक विश्लेषण तपासणी आणि सक्षमतेची चाचणी करायची आहे. आरोपीने यापूर्वीही असे गुन्हे केले आहेत का किंवा पीडितेवर आधी अत्याचार झाले आहेत का, याचा तपास करायचा आहे. ज्या शस्त्राने चिमुकलीची हत्या केली, ते शस्त्र जप्त करायचे असून साक्षीदारांचे जबाब नोंदवायचे आहेत. या गुन्ह्यात त्याला इतर कोणी मदत केली आहे का, याचीही चौकशी केली जाणार आहे, असा युक्तिवाद तपास अधिकाऱ्यांनी केला.

Continues below advertisement

Pune Bhor Crime: नवले पुलावर घटनेचे तीव्र पडसाद 

दुसरीकडे, या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी पुण्यातील नवले पुलावर पाहायला मिळाले. "नराधमाला फाशी द्या, नाहीतर आमच्या ताब्यात द्या," अशी मागणी करत संतप्त नागरिकांनी आणि पीडितेच्या पालकांनी चिमुकलीचा मृतदेह रुग्णवाहिकेत ठेवून सुमारे चार तास रस्ता रोखून धरला होता. या आंदोलनामुळे पश्चिम बाह्यवळण मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. अखेर रात्री उशिरा पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांना पांगवले, त्यानंतर रात्री उशिरा चिमुकलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

आणखी वाचा 

Sanjay Raut and Devendra Fadnavis: नसरापूर प्रकरणात गृहमंत्रीच आरोपी असायला हवा, सरकारचाच एन्काऊंटर केला पाहिजे: संजय राऊत