एक्स्प्लोर

Pune Baramati Crime: अभ्यास अन् परीक्षेचं टेन्शन, बारामतीत 16 वर्षीय विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल; वडिलांच्या डोळ्यादेखत इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं

Pune Baramati Crime News : बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये राहणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीने आज (4 सप्टेंबर 2026) पहाटेच्या सुमारास टोकाचं पाऊल उचलंय.

Pune Baramati Crime News बारामती : बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीतील भिगवण रोड परिसरातील एका निवासी इमारतीमध्ये राहणाऱ्या 16 वर्षीय विद्यार्थिनीने आज (4 सप्टेंबर 2026) पहाटेच्या सुमारास टोकाचं पाऊल (Baramati Crime News) उचलंय. इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील टेरेसवरून खाली उडी मारून या विद्यार्थिनीनं जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या विद्यार्थिनीला तातडीने उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालय, बारामती येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे 5 वाजताच्या सुमारास तिचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अभ्यास आणि परीक्षेच्या ताणातून तिनं हे टोकाचं पाऊल (Crime News) उचलल्याची प्राथमिक माहिती पालकांनी दिली असून बारामती शहर पोलिसांकडून या प्रकरणाचा सध्या सर्व बाजूंनी तपास आणि सखोल चौकशी सुरु आहे. मात्र या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Baramati Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी बारामती येथील एका महाविद्यालयात इयत्ता अकरावी सायन्समध्ये शिक्षण घेत होती. सध्या तिच्या परीक्षा सुरू होत्या. तिच्या आई-वडिलांनी पोलिसांना दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून ती अभ्यास व परीक्षेचा ताण घेत होती. अभ्यास होत नसल्याबाबत तसेच परीक्षेचे टेन्शन येत असल्याबाबत ती आई-वडिलांकडे बोलत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Baramati Crime News: वडिलांच्या डोळ्यादेखत स्वतःला चौथ्या मजल्यावरून झोकून दिलं

अशातच आज (04/09/2026) रात्री ती सुमारे 12.30 वाजेपर्यंत अभ्यास करत होती. त्यानंतर टेरेसवर जाऊन येत असल्याचे सांगून ती इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील गच्चीवर गेली. बराच वेळ होऊनही ती खाली न आल्याने तिचे वडील तिला पाहण्यासाठी वर गेले. त्यावेळी ती टेरेसच्या कड्यावर खाली पाय सोडून बसलेली दिसली. वडिलांनी तिला आवाज देऊन विचारणा केली असता तिने त्यांच्याकडे पाहून अचानक टेरेसवरून खाली उडी मारल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून प्राप्त झाली आहे.

Pune Baramati Crime: आईकडे पाणी मागितलं, पण उपचारादरम्यान दुर्दैवी अंत

विद्यार्थिनी इमारतीच्या समोरील भागात खाली पडल्याने तिला गंभीर दुखापत झाली. आई-वडील व शेजाऱ्यांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना काही काळ ती शुद्धीवर होती व तिने आईकडे पिण्यासाठी पाणी मागितल्याची माहिती पालकांनी दिली आहे. त्यानंतर तिची प्रकृती गंभीर झाली व उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सदर घटनेबाबत विद्यार्थिनीच्या आई-वडिलांनी अथवा नातेवाईकांनी सद्यस्थितीत कोणत्याही व्यक्तीविरुद्ध तक्रार किंवा संशय व्यक्त केलेला नाही. अभ्यास व परीक्षेचा ताण असल्याची प्राथमिक माहिती पालकांकडून प्राप्त झाली असली तरी, आत्महत्येमागील नेमकं कारण अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही.

सदर विद्यार्थिनीबाबत यापूर्वीही घरातून निघून गेल्याची नोंद बारामती शहर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली होती. त्या संदर्भातील पूर्वीच्या प्रकरणातील कागदपत्रे, जबाब व तपासादरम्यान निष्पन्न झालेल्या बाबींची सध्याच्या घटनेच्या अनुषंगाने पडताळणी करण्यात येत आहे. प्राथमिक चौकशीत सदर विद्यार्थिनीकडे स्वतःचा वैयक्तिक मोबाईल फोन नसल्याची माहिती मिळाली आहे. ती आवश्यकतेनुसार तिच्या आई-वडिलांच्या मोबाईल फोनचा वापर करत होती. त्या अनुषंगाने आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संबंधित मोबाईलमधील घटनेशी संबंधित उपलब्ध डिजिटल माहितीची पडताळणी करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे.

तसेच घटनास्थळाची पाहणी, आवश्यक पंचनामे, उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय कागदपत्रे, डिजिटल बाबी तसेच पालक, नातेवाईक, मैत्रिणी, सहाध्यायी, शिक्षक व आवश्यक संबंधित व्यक्तींचे जबाब घेऊन घटनेमागील नेमकी वस्तुस्थिती निष्पन्न करण्याच्या दृष्टीने बारामती शहर पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

Pune Crime : अभ्यासाचा ताण की इतर काही कारण? पोलिसांकडून तपास सुरु

अभ्यासाचा ताण हे पालकांकडून सांगण्यात आलेले प्राथमिक कारण असून, त्याव्यतिरिक्त वैयक्तिक, शैक्षणिक, कौटुंबिक किंवा अन्य कोणती पार्श्वभूमी होती काय, तसेच कोणत्याही व्यक्तीकडून त्रास, दबाव किंवा आत्महत्येस प्रवृत्त करण्यासारखी बाब घडली होती काय, याचीही निष्पक्षपणे पडताळणी करण्यात येत आहे. सदर प्रकरणी कायदेशीर प्रक्रियेनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील चौकशी बारामती शहर पोलीस स्टेशनकडून करण्यात येत आहे. अल्पवयीन मृत विद्यार्थिनीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. नागरिक व प्रसारमाध्यमांनीही तिचे नाव, छायाचित्र किंवा ओळख पटेल अशी वैयक्तिक माहिती प्रसिद्ध करू नये, असे आवाहन बारामती शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Pimpri-Chinchwad YCM Hospital: मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
मृत्यूचा दाखला घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला रात्रभर थांबवलं; शवविच्छेदन विभागात दारू पार्टी, मद्याचे पेग, चकना अन् जेवणाची ताट, वायसीएममधील धक्कादायक व्हिडीओ समोर
Thane Crime Pradeep Purnekar Case: राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
राजेंद्र शिंदेंची सलग दोन दिवस कसून चौकशी, पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली? पूर्णेकरांच्या वकिलाच्या वक्तव्याने सस्पेन्स वाढला
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
मालेगाव सुपारी घोटाळा प्रकरण! FDA च्या पाच अधिकाऱ्यांचं निलंबन, मंत्री झिरवळ आणि तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime: तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
तोतया पोलिसानं मुलीच्या लफड्यात अडकवण्याची धमकी दिली, पुण्यातील आयटी इंजिनिअरने 27 व्या मजल्यावरून उडी मारुन आयुष्य संपवलं
Abhijeet Dipke: दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिस मला कधीही अटक करू शकतात, साध्या वेषात पोलिसांकडून पाठलाग; अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Tukaram Mundhe on MPSC Paper Committee: ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात,
ज्यांच्या नावावर विश्वास ठेऊन एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतलं तेच तुकाराम मुंढे म्हणतात, "मला कोणतेही पत्र मिळालेले नाही!"
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
Ind vs Zim 1st T20 Live Streaming : स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
स्मृती मानधना पहिल्यांदाच कर्णधार! झिम्बाब्वेविरुद्ध आज रंगणार टी-20थरार, पहिला सामना किती वाजता अन् LIVE कुठे पाहायचा? जाणून घ्या सर्व डिटेल्स
A 75 year old man and a 30 year old Girl in UP: ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
ही अनोखी गाठ कोणी बांधली! 75 वर्षांच्या आजोबांचे मुलीच्या 30 वर्षांच्या मैत्रिणीसोबत प्रेमाचे सूर जुळले, 45 वर्षांचं अंतर असूनही करणार लग्न
Ashok Saraf Rahul Deshpande Tabla Jugalbandi: राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, 'आदि अनंत'च्या म्युझिक लॉन्चला सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले, VIDEO
राहुल देशपांडे गाताना अशोक सराफ तबला वाजवायला लागले, सगळे अवाक् होऊन पाहतच राहिले... VIDEO
Amravati : महायुतीतील तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न? अमरावतीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अन् पुण्यात युतीत बिघाडी, आता भाजप-शिवसेनेचे दिग्गज नेते मैदानात
महायुतीतील तिन्ही पक्षांचा एकमेकांना चेकमेट करण्याचा प्रयत्न? अमरावतीमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये अन् पुण्यात युतीत बिघाडी, आता भाजप-शिवसेनेचे दिग्गज नेते मैदानात
Embed widget