Pune Accident News :  पुण्याच्या मुळशी तालुक्यातील चांदे-मूलखेड रस्त्यावर एकभीषणअपघाताची (Accident News) घटनाघडलीआहे. यात रिक्षा आणि फॉर्च्युनर गाडीची धडक होऊन भीषण अपघात (Pune Accident News)झाल्याची माहितीआहे. या अपघातात रिक्षाचालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाआहे. तर फॉर्च्युनरमधील तिघे जण जखमी झाल्याचीमाहितीआहे. यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भेगडेंच्या (Prakash Bhegade) डोक्याला देखील दुखापत झाल्याने तेही जखमी झाले आहेत.

Pune Accident : रिक्षाचालकाचा जागीच मृत्यू, ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जखमी

मिळालेल्यामाहितीनुसार, विकास अर्जुन पारखी असं मृत्यू झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य करत जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर अभिमन्यू अर्जुन पारखी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फॉर्च्युनर चालकावर मुळशीतील पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्यायाप्रकरणाचाअधिकतपास पौड पोलीस करत आहेत. दरम्यानया अपघातात दोन्हीही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय.

Pune Crime News : पैशाच्या वादातून वडिलांनी मुलावर ॲसिड हल्ला

दुसरीकडेपुण्यात पैशाच्या वादातून वडिलांनी मुलावर ॲसिड हल्ला केल्याचीघटनाघडलीआहे. कोथरूडमध्येहिघटनाघडलीआहे. पैशाच्या वादातून वडिलांनी मुलाच्या अंगावर घरातील स्वच्छतेसाठी वापरण्यात येणारे ऍसिड फेकल्याची घटना कोथरूड मधील केळेवाडी येथे घडली आहे. या घटनेत मुलाला डोळा आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर वडील पसार झाले आहेत. सध्यापोलीसयाघटनेचा तपास करत असूनवडिलांचाशोधघेत आहे. मात्रया घटनेनंपरिसरातएकचखळबळउडालीआहे.

Pune Crime : वडीलाविरोधात गुन्हा दाखल

मिळालेल्यामाहितीनुसार, तुषार शाम कदम (वय 30) अशी जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. त्यांनी कोथरूड पोलिसांनी तक्रार दिल्यानंतर वडीलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 मे रोजी तुषार घरात झोपला असताना पैशावरून वडिलांसोबत वाद झाल्याने वडिलांनी स्वच्छतागृहात स्वच्छ करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या ऍसिड बाटली चेहऱ्यावर ओतली. यात मुलगा जखमी झालाय. सध्यायाघटनेचा अधिक तपास कोथरूड पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा

Ashok Kharat Crime News: चाकणकर भगिनींची चौकशी, 17 गुन्हे, 105 साक्षीदार अन् ED चा ससेमिरा; अशोक खरातच्या अटकेला 2 महिने पूर्ण, आतापर्यंत काय-काय घडलं?