Pratibha Chakankar On Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणी शिर्डी पोलिसांनी या प्रकरणातील संशयित खातेदार प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) आणि तन्मय चाकणकर यांची तब्बल आठ तास चौकशी केली. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी, कधीही समता पतसंस्थेत खाते उघडलेले नाही किंवा तेथे गेलेले नाहीत. तसेच दिलेला पत्ताही चुकीचा असल्याचं प्रतिभा चाकणकरांनी चौकशीनंतर सांगितले. (Pratibha Chakankar On Ashok Kharat Case)

अशोक खरात (Ashok Kharat) याला गुरुस्थानी मानणाऱ्या रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) आणि त्यांची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकरांच्याही (Pratibha Chakankar) अडचणीत मोठी वाढ झाली. शिर्डी पोलिसांकडून काल प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी करण्यात आली. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबीयांच्या नावे 4 खाती असल्याचं समोर आलंय. स्वत: प्रतिभांच्या नावे 2 तर मुलांच्या नावे 2 खाती आहेत. या खात्यांवरुन 2 कोटींच्यावर आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय याचा जबाब नोंदवण्यात आला. सख्ख्या बहिणी असणाऱ्या रुपाली आणि प्रतिभा या सख्ख्या जावादेखील आहेत. 

प्रतिभा चाकणकर 8 तासांच्या चौकशीनंतर काय काय म्हणाल्या? (Pratibha Chakankar On Ashok Kharat Case)

पोलिसांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकरांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी माझ्या नावाची खाती बनावट आहे. सह्या देखील नाही. मी एकही रुपयाची देखील उलाढाल केलेली नाही. माध्यमांवर बातम्या बघून आम्ही जबाब द्यायला आलो. शिर्डी पोलिसांची नोटीस अद्याप मिळालेली नाही. कागदपत्रे आणि सह्या बनावट असल्याची प्रतिक्रिया प्रतिभा चाकणकर यांनी दिली. तसेच प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांची बनावट खाती उघडण्यात आली.  त्या समता पतसंस्थेत कधीही गेल्या नाहीत. खाते उघडताना पत्ता देखील चुकीचा वापरण्यात आला. प्रतिभा आणि तन्मय याच्या सह्यांचे नमुने पोलिसांना दिले. सर्व खातरजमा झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो. चाकणकर पोलिसांना वेळोवेळी सहकार्य आणि तपासात मदत करतील. पोलिसांची चौकशी सुरू असून कायदेशीर कारवाई बाबत चर्चा करूनच निर्णय घेऊ...मात्र पतसंस्थेत खाते संदर्भात कोणतेही तत्थ नाही, अशी माहिती प्रतिभा चाकणकर यांच्या वकील जयश्री काळे-पालवे यांनी दिली.

अशोक खरात प्रकरणात ईडी अॅक्शन मोडवर- (Ashok Kharat Case)

अशोक खरात प्रकरणात ई़डीकडून मोठी कारवाई सुरू करण्यात आली आहे. नाशिक, पुणे आणि शिर्डी परिसरात एकाच वेळी छापेमारी करत ईडीने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. शिर्डी परिसरातील समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत ईडीचे पथक दाखल झाले असून, अशोक खरात नॉमिनी असलेल्या सुमारे 100 खात्यांची चौकशी सुरू आहे. या खात्यांमधून 60 कोटींहून अधिक रकमेचे व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे नाशिकमध्ये 5, पुण्यात 3 आणि शिर्डीत 3 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. समता पतसंस्थेशी संबंधित आर्थिक व्यवहारांची सखोल पडताळणी सुरू असून, खरातच्या मालमत्ता आणि निधीच्या स्रोताचा शोध घेतला जात आहे. तर नाशिकमधील तृप्तबाला निवासस्थानी आयकर विभागाकडूनही छापेमारी करण्यात आल्याची माहिती आहे. खरेदी-विक्रीशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

संबंधित बातमी:

Ashok Kharat : देवदर्शनासाठी खरातनं कागदपत्रं घेतली आणि बनावट खाते उघडून कोट्यवधींचे व्यवहार केले; रुपाली चाकणकरांच्या बहिणीचा दावा, आरोप फेटाळले