एक्स्प्लोर

Pradeep purnekar Death case and Rajendra Shinde: मोठी बातमी: मिनाक्षी शिंदेंचे पती आणि टल्ली-पपलीची समोरासमोर चौकशी, प्रदीप पूर्णेकर खटल्यात मोठी घडामोड

Pradeep purnekar Death case and Rajendra Shinde: राजेंद्र शिंदे आणि प्रदीप पूर्णेकरांच्या मारेकऱ्यांना समोरासमोर बसवून चौकशी, ठाणे क्राईम ब्रांचच्या ऑफिसमध्ये काय घडलं?

Pradeep purnekar Death case and Rajendra Shinde: ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरणाचा तपास आता अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झाल्यापासून चौकशीच्या फेऱ्यापासून दूर असलेले राजेंद्र शिंदे यांना ठाणे गुन्हे शाखेने मंगळवारी अचानक चौकशीसाठी बोलावून घेतले आहे. गेल्या तासाभरापासून ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात राजेंद्र शिंदे यांची चौकशी सुरु आहे. विशेष म्हणजे प्रदीप पूर्णेकर यांच्या मारेकऱ्यांनाही पोलिसांनी याच कार्यालयात आणले आहे. या सगळ्यांना समोरासमोर बसवून आता पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या चौकशीतून प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येबाबतचा एखादा महत्त्वाचा दुवा  पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये या चौकशीतून कोणती माहिती समोर येणार, हे बघावे लागेल. (Thane Crime news)

प्रदीप पूर्णेकर यांची 29 सप्टेंबरला रात्री साडेनऊच्या सुमारास मनोरमा नगरमधील त्यांच्या कार्यालयात हत्या झाली होती. पाच मारेकऱ्यांनी कार्यालयात घुसून प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या आणि त्यांच्यावर कोयत्याने वार करुन त्यांना ठार मारले होते. याप्रकरणात पूर्णेकर कुटुंबाने ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. राजकीय वैर आणि स्थानिक पातळीवर वर्चस्वाच्या लढाईतून मिनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनीच प्रदीप पूर्णेकर यांना सुपारी देऊन संपवले, असा दावा पूर्णेकरांच्या कुटुंबाने केला होता. संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडल्यानंतर पोलिसांकडून पुरवणी एफआयआरमध्ये राजेंद्र शिंदे आणि मिनाक्षी शिंदे यांच्या नावाचा समावेश केला होता. मात्र, या दोघांविरोधात कोणतीही ठोस कारवाई झाली नव्हती. परंतु, आता राजेंद्र शिंदे यांना चौकशीला बोलावल्याने आणि पूर्णेकर यांच्या मारेकऱ्यांसमोर बसवून त्यांची चौकशी होत असल्याने पोलिसांच्या हाती एखादा महत्त्वाचा दुवा लागल्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात मुख्य आरोपी संतोष कनजिया उर्फ टल्ली आणि आरोपी अमित जयकिशन सिंग उर्फ पपलू या दोघांना काहीवेळापूर्वीच ठाणे खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा येथे चौकशीसाठी आणण्यात आले. क्राईम ब्रांचकडे सध्या हत्येत सहभागी पाचही आरोपी अटकेत आहेत. त्यांना देखील समोरासमोर बसवून उलट तपासणी करण्यात आली. या चौकशीत समोर आलेले मुद्दे घेऊन आज राजेंद्र शिंदे यांना चौकशीला बोलावण्यात आले होते. त्यानंतर आता  आरोपी आणि राजेंद्र शिंदे यांची आता समोरासमोर चौकशी सुरू आहे.

आणखी वाचा

Thane Crime Pradeep purnekar Death: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, क्राईम ब्रांचने मिनाक्षी शिंदेंच्या पतीला चौकशीला बोलावलं

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
Nagpur Couple Death Marathi News: दिवाळीसाठी आले, शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवले; नागपुरमधील खळबळजनक घटना
दिवाळीसाठी आले, शिक्षक दाम्पत्याने जीवन संपवले; नागपुरमधील खळबळजनक घटना
Nagpur Fire Accident: दिवाळीच्या दिवशी राज्यभर आगींचा भडका! नागपूर शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 43 ठिकाणी आग, TVS शोरूमच्या आगीत 45 दुचाकी जळून खाक
दिवाळीच्या दिवशी राज्यभर आगींचा भडका! नागपूर शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 43 ठिकाणी आग, TVS शोरूमच्या आगीत 45 दुचाकी जळून खाक
Amravati Crime News: दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
दिवाळीच्या सणात अमरावतीत रक्तरंजित घटना; तरुणाला भोसकून संपवलं, अज्ञात आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु
Advertisement

व्हिडीओ

Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?
Gokul Chairman Election 2026: गोकुळमध्ये शासननियुक्त 4 संचालक पोहोचले तेव्हा...काय घडलं?, VIDEO
Vivekanand Patil Gokul Morcha Speech : कोरमचं कौतुक सांगू नका, गोकुळ मोर्चातील धमाल भाषण
Varsha Usgaonkar Majha Katta: कॉलेजचे किस्से ते सिनेमातील प्रवास,वर्षा उसगांवकरांसोबत दिलखुलास गप्पा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
Video: पाडव्यादिनी सुनील तटकरे बारामतीत; सुनेत्रा पवारांसोबत 45 मिनिटे चर्चा, विलिनीकरणाच्या मुद्द्यावर स्पष्टच बोलले
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
बारामतीत 10 हजार पणत्यांनी उजळला सनसेट पॉईंट; अजित दादांच्या आठवणीत बारामतीकर भावूक
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
दफनविधीसाठी जागा मिळेना, 8 तासांपासून मृतदेह प्रतिक्षेत; पीडित कुटुंबीयांचा संताप, तोडगा काढण्याचा प्रयत्न
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 नोव्हेंबर 2026 | मंगळवार
Gokul Chairman Election 2026: गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
गोकुळच्या अध्यक्षपदी अजित पवारांचा 'राईट हँड' राजेश पाटील यांची निवड; महायुतीने अखेर कंडका पाडलाच, नेमकं काय काय घडलं?, A टू Z माहिती
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
माझ्या विद्याच्या घरातील 4 माणसं जेलमध्ये होती, पहिल्या पत्नीबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील भावनिक, म्हणाले, बंटी पाटील तू मला घटना शिकवणार का?
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांना भेटणार, भेटीसाठी मागितली वेळ; विलिनीकरणाच्या चर्चेत राजकीय घडामोडींना वेग
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
गोकुळसंदर्भात मी कायदा आणि संस्थेच्या मागे; मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज'कारण', राहुल गांधींनाही केलं लक्ष्य
Embed widget