पुणे: पुणे शहरातील डेक्कन परिसरातील भिडे पुलाजवळ मुळा-मुठा नदीपात्रात एक मृतदेह वाहून आल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ (Pune Crime News) उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ८ वाजताच्या सुमारास डेक्कन पोलिसांना भिडे पुलाजवळील नदीपात्रात एक मृतदेह (Pune Crime News) पडल्याची माहिती कॉलरद्वारे मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून डेक्कन पोलीस ठाण्याचे पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.(Pune Crime News)
Pune Crime News: सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास डेक्कन पोलिसांना फोन आला
अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला आहे. हा मृतदेह एका पुरुषाचा असून त्याची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलिसांकडून सुरू आहे. संबंधित व्यक्तीचा मृत्यू पाण्यात बुडून झाला की यामागे काही घातपात (Pune Crime News) आहे, या दिशेने डेक्कन पोलीस पुढील तपास करत आहेत. सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास डेक्कन पोलिसांना नदीपात्रात एक मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर डेक्कन पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.(Pune Crime News)
Pune Crime News: मृत्यू नेमका कशामुळे झाला, तो अपघात आहे, आत्महत्या आहे तपास सुरू
दरम्यान, संबंधित व्यक्तीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तो अपघात आहे, आत्महत्या आहे की अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात येणार असून त्याच्या अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. डेक्कन पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, स्थानिकांकडून माहिती आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत. तसेच बेपत्ता व्यक्तींच्या नोंदींचीही पडताळणी सुरू आहे. (Pune Crime News)
