पुणे : वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट झाल्या असून इंदापूरमध्ये (Indapur) एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. दरोड्याची योजना आखणाऱ्या एका दरोडेखोरोला इंदापूर पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्यावेळी, त्याच्याकडून मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर पोलिसांनी (Police) दरोडेखोराकडून 9 सुतळी बॉम्ब (Bomb), 3 पिस्टलसह अन्य शस्त्र हस्तगत केले आहेत. सुयश ऊर्फ तात्या सोमनाथ असं आरोपीचं नांव आहे. याप्रकरणी आता वालचंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून आरोपीकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.  


वालचंदनगर पोलिसांनी तब्बल नऊ बॉम्ब, तीन पिस्टल आणि तलवारी व कोयते घेऊन दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगाराला वेळीच सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी याबाबत माहिती दिली. आरोपी सुयश ऊर्फ तात्या सोमनाथ घोडके याचा वालचंदनगर पोलीस शोध घेत होते. तो वालचंदनगर येथील अंजली बाल मंदीर क्रमांक 01 येथील कामगार वसाहतीच्या पोस्ट कॉलनी डी-3 मधील खोली क्रमांक 03 मध्ये त्याच्या मित्रांसोबत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्यानुसार वालचंदनगर पोलिसांच्या पथकाने संबंधित खोलीवर सापळा लावला, त्यानंतर योग्य वेळ साधत सदर आरोपीला ताब्यात खोलीवरुनच ताब्यात घेतले. 


आरोपीकडून पोलिसांनी 3 गावठी पिस्टल मॅग्झीन सहीत एक खाली मॅग्झीन, दहा जिवंत काडतुसे (राऊंड),चौदा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, दोन लोखंडी कटर, एक लोखंडी तलवार, दोन लोखंडी चाकू, एक मुठ नसलेले तलवारीचे पाते आणि  9 सुतळी बॉम्ब असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. त्यामुळे, इंदापूर किंवा परिसरात मोठा गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या या गुन्हेगार टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. 


हेही वाचा


अजित पवार म्हणाले आमदार बदलला पाहिजे; आता युगेंद्र पवार उतरले बारामतीच्या मैदानात