Pimpri-Pune Liquor Poisoning Crime : पुणे आणि पिंपरी-चिंचवडसहराज्यातखळबळउडवणाऱ्या विषारी दारू प्रकरणाच्या (Pimpri-Pune Liquor Poisoning) तपासासंदर्भातएकमोठीअपडेटसमोरआलीआहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील आणखी चार पोलीस कर्मचारी निलंबित करण्यातआलेआहे. दरम्यान, पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातील आत्तापर्यंत 29 जणांचे निलंबन (Pimpri Crime liquor poisoning Crime Case) करण्यातआलेअसून विषारी दारू प्रकरणातील मुख्य आरोपी राधेश्याम प्रजापती (Radheshyam Prajapati)याच्याशी संपर्कात पोलीसकर्मचारी असल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालेआहे. परिणामीतपासाअंतीआताआणखी चार पोलीस कर्मचारी निलंबित करण्यातआलेआहे. (Pimpri-Pune Liquor Poisoning)
Pimpri-Pune Liquor Poisoning Crime Case : आत्तापर्यंत 29 जणांचे निलंबन
मिळालेल्यामाहितीनुसार, अजित शिवाजी काळे (पोलिस हवालदार, उरुळी कांचन पोलिस ठाणे), सुमीत नंदकुमार वाघ (पोलिस अंमलदार, उरुळी कांचन), रामदास ज्ञानदेव जगताप (पोलिस हवालदार, यवत) आणि सुभाष बलभीम डोईफोडे (पोलिस हवालदार, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय) अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. पुणे, पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण या पोलीस दलासह राज्य उत्पादन शुल्क या ठिकाणच्या अधिकारी कर्मचारी मिळून आत्तापर्यंत 29 जणं निलंबित करण्यातआलेआहे.
दरम्यान, पुणे शहर पोलीस दलातील 3, पिंपरी चिंचवड पोलिसांतील 6, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 13 तर पुणे ग्रामीण पोलीस दलातील 7 असे एकूण 29 जणांचे निलंबन करण्यातआलेआहे. दुसरीकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी हातभट्टी दारूमुळे नागरिकांचा मृत्यू झालेल्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरातही उमटतांनादिसतआहे. राज्यातीलअनेकजिल्ह्यातआतापोलीस प्रशासनधडककारवाईकरतहातभट्टीचेठिकाणंउध्वस्थकेलेआहे.
Ambadas Danve : अंबादास दानवे यांनी घेतली पोलीस आयुक्तांची भेट, पोलिसांनासह आरोपी करण्याचीमागणी
पुणे आणि पिंपरी-चिंचवडसहराज्यातखळबळउडवणाऱ्या विषारी दारू प्रकरणात आत्तापर्यंत 22 जणांचा बळी घेतलाआहे. ही विषारी दारू फुगेवाडीतच (Pimpri-Pune Liquor Poisoning) बनवली जात होती. दरम्यान, पुण्यातील विषारी दारू प्रकरणातठाकरेंच्याशिवसेनेचेनेते अंबादास दानवे यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यावेळीत्यांनी भेट घेवून ज्या पोलिसांना निलंबित केला आहे, त्यांना सह आरोपी करण्याची मागणी केलीय. फक्त निलंबन करू नका, तेवढ्यावर चालणार नाही. त्यांना सहआरोपी करा. त्यांना या सगळ्या धंद्याची माहिती होती, तरीही अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही? असासवालहीत्यांनीकेलाआहे.
