दापोडी : पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे सुरू झालेले मृत्यूचे तांडव थांबत नसून सारे शहरच हादरून गेले आहे. एकामागून एक सुरू असलेल्या मृत्यूसत्रामुळे परिसरात शोककळा (Pimpri Crime liquor poisoning) पसरली आहे. आनंदवन, काटेवस्ती, संजयनगर, आझाद चौक आणि जय महाराष्ट्र चौक या परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले असून, परिसरात भीतीचे वातावरण आहे. तर विषारी दारूमुळे एकाच घरातील दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विषारी दारुमुळे पिंपरी चिंचवडच्या (Pimpri Crime liquor poisoning) फुगेवाडीतील विजय राठोड आणि विजु राठोड या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झालाय तर त्यांचे वडील प्रकाश यांची देखील दृष्टी नाहीशी झाली आहे. त्यांनाही उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विजय आणि राजू राठोड हे दोघांचीही मुलं लहान आहेत. त्यांच कुटुंब या दारुकांडामुळे अक्षरश: उघड्यावर आलं आहे.(Pimpri Crime liquor poisoning)
दोघांच्या पत्नी सारिका आणि संगीता या दोघींनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, “घरातील कर्ते पुरुष गेले, आता मुलांना कसं वाढवायचं?” असा आक्रोश पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडीतील राठोड कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. विषारी दारूमुळे विजय राठोड आणि विजू राठोड या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला, तर त्यांचे वडील प्रकाश राठोड यांचीही दृष्टी गेली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विजय आणि विजू या दोघांचीही मुलं अजून लहान आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर मोठं संकट कोसळलं असून कुटुंब अक्षरशः उघड्यावर आलं. पती गमावल्याचं दुःख आणि पुढील आयुष्याची चिंता व्यक्त करताना पत्नी सारिका आणि संगीता राठोड यांना अश्रू अनावर झाले. “आता मुलांचं शिक्षण, घरखर्च कसा चालवायचा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई करावी आणि कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. या संपूर्ण घटनेनंतर फुगेवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.(Pimpri Crime liquor poisoning)
Pimpri Crime liquor poisoning: एकाच दिवशी सख्खे भाऊ गेले
एका कुटुंबाच्या हसत्या खेळत्या संसाराची एका दिवसातच राखरांगोळी झाली. घराचा मुख्य आधार असलेली दोन कमावती मुले एकाच दिवशी सोडून गेली. फुगेवाडी परिसरातील राठोड कुटुंबातील दोन सख्ख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू झाला. या घटनेनं परिसरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहेत. विजय आणि राजेंद्र राठोड यांच्या पत्नी सोनाली राठोड आणि संगीता राठोड यांनी हंबरडा फोडला होता. सोनाली यांना एक मुलगा आणि मुलगी, तर संगीता यांना दोन मुले. दोघा भावांनी कष्टानं संसाराचा गाडा चालवला होता. या दोन्ही भावांनाही प्रत्येकी दोन-दोन लहान मुले आहेत. चिमुरड्यांचे भविष्य चांगलं व्हावं, म्हणून हे दोन्ही भाऊ मुंबई सोडून फुगेवाडी परिसरात कामाला आले होते. त्यातच हा घात झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
Pimpri Crime liquor poisoning: या मृत्यूप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या प्रकरणात माझं पुणे पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी विषारी दारू तयार झाली हे पोलिसांनी शोधून काढलेले आहे. याच्या पाठीमागे जे काही लोक आहेत, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आणखी काही लोक यात असू शकतात. ते शोधण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्यांची प्रकृती गंभीर आहे त्यांना उपचार करून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही घटना अत्यंत गंभीर आहे. ज्या ठिकाणी हे सगळं तयार झालं त्याच्या पाठीमागे कोण-कोण आहेत हे पोलीस शोधून काढत आहेत. आतापर्यंत आठ लोकांना अटक झाली आहे. अजून काही लोकांना अटक होऊ शकते. या प्रकरणातील संपूर्ण साखळी शोधून त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण ही एक प्रकारे हत्याच आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
Pimpri Crime liquor poisoning: तोंडाला फेस, लक्षणे सारखीच
दुसऱ्या घटनेत, अकबर अजीम खान पठाण यांना तोंडातून फेस येत असल्याने बुधवारी रात्री 'वायसीएम'मध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी दुपारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ते गेल्या १५ वर्षांपासून दारू पीत असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. तिसऱ्या घटनेत, राजेश राजपूत गुरुवारी सकाळी अचानक बेशुद्ध पडल्याने त्यांना रुग्णालयात आणले; पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांना दोन मुली असून ते बँक रिकव्हरीचे काम करत.गुरुवारी रात्री आनंद निकाळजे आणि आनंद देसाई या आणखी दोघांचा मृत्यू झाला. लागोपाठ झालेल्या पाच मृत्यूंमुळे परिसरात शोककळा पसरली. या पाचही मृतदेहांचे वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
Pune Crime liquor poisoning: पोलिसांनी दिली माहिती
आम्ही गुन्हा दाखल केला आहे,, युध्दपातळीवर तपास सुरू आहे, रिपोर्ट आल्यानंतर नेमकं काय घडलं ते समजेल, पूर्ण परिसराची आणि जिथे दारू सेवण झालं आहे, तिथे असलेले सीसीटीव्ही तपासले जात आहेत, आज संध्याकाळपर्यंत गोष्टी समोर येतील, यामध्ये जे कोणी सामील असेल त्यांच्यावर कठोर कारवाई होईल, पिंपरी चिंचवड पोलिसही तपास करत आहेत, त्यांच्या ताब्यात काही आरोपी आहेत, तपास सुरू आहे, जर या प्रकरणाची पोलिसांना माहिती असेल त्यांनी कारवाई केली नसेल तर त्या पोलिसांवर देखील कारवाई केली जाईल, असंही पुढे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे.
ण्यातील हडपसर परिसरातील पांढरे मळा येथे विषारी दारूमुळे पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तींनी परिसरातील एका बेकायदेशीर दारूच्या अड्ड्यावर जाऊन दारू सेवन केल्याची माहिती समोर आली आहे. दारू प्यायल्यानंतर त्यांना पोटदुखी, मळमळ आणि प्रकृती बिघडल्याचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान सर्वांचा मृत्यू झाला अशी माहिती सुनंदा साबळे (वय ६२) या स्थानिक महिलेने दिली.
या घटनेनंतर संपूर्ण वस्तीत शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेषतः महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, परिसरात अनेक दिवसांपासून बेकायदेशीररित्या दारू विक्री सुरू असल्याचा आरोप केला आहे. स्थानिकांनी याबाबत वारंवार पोलिसांकडे तक्रारी दिल्या होत्या. मात्र, पोलीस केवळ तात्पुरती कारवाई करून निघून जात आणि काही दिवसांत पुन्हा दारूचे अड्डे सुरू होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. तसेच, काही पोलिसांकडून हप्ते घेतले जात असल्याचाही गंभीर आरोप स्थानिक महिलांनी केला आहे. या निष्काळजीपणामुळेच निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला असून, या मृत्यूंसाठी संबंधित यंत्रणा आणि बेकायदेशीर दारू विक्रेते जबाबदार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
