Pune Pimpri Chinchwad crime news : भारतात घुसखोरी करुन अनधिकृतरीत्या राहणाऱ्या 6 बांगलादेशी नागरिकांना पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक चार पोलिस पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पिंपरी चिंचवड शहरात राहणारे काही बांगलादेशीनागरिक वाकड येथील भुजबळ चौक इथून मुंबईच्या दिशेने जाणार असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा क्रमांक चार पोलीस पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई करत सहा बांगलादेशी नागरिकांना बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये मोहम्मद उस्मान शिराजून अली शेख वय 34 वर्ष, अब्दुल्ला सागर मुल्ला वय 25 वर्ष, मोबीन हारून शेख वय 39 वर्ष, जहागीर बिलाल मुल्ला वय 35 वर्ष, मोहम्मद इलाहीन इलियास विश्वास वय 22 वर्ष आणि तोहीद मुसलेम हसन शेख वय 26 वर्ष अशी पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या बांगलादेशी नागरिकांची नाव आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे हे बांगलादेशी नागरिक पिंपरी चिंचवड शहरात वास्तव्यास होते. मात्र आता पोलिसांनी बांगलादेशी नागरिकांना बेड्या ठोकल्यानंतर त्यांचं बांगलादेशात यशस्वी प्रत्यारपण केला आहे.
राज्यात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून चर्चेत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बांगलादेशी नागरिक आढळून आले आहेत. त्या सर्व नागरिकांना पोलिस प्रशासनाने ताब्यात देखील घेतलं आहे.
महत्वाच्या बातम्या:
