Pawanraje Nimbalkar Case धाराशिव : राजकीय वर्तुळातील बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज, 20 जून रोजी मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) लागणार आहे. दरम्यान, या ऐतिहासिक आणि संवेदनशील खटल्याचा अंतिम निकाल 16 जून रोजी मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Sessions Court) लागणे अपेक्षित होते. मात्र, "निकाल तयार करण्यासाठी आणखी काही दिवसांची गरज आहे," असे स्पष्ट करत न्यायधीशांनी हा निकाल पुढे ढकलला होता. परिणामी आज तब्बल 20 वर्षांनंतर लागणाऱ्या या निकालाकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. (Dharashiv News)
दरम्यान, महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांनी सुपारी देऊन पवनराजे यांची हत्या घडवून आणल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणात कोर्ट काय निकाल देणार? याकडे राजकीयवर्तुळासहराज्यच लक्ष लागलं आहे. पण पवनराजे यांची हत्या कशी झाली होती? त्यांना कुणी मारलं? नेमका कुणावर आरोप केलेगेले, शिवायआतापर्यंतनेमकंकाय- कायझालं, याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
नेमकं प्रकरण काय? (What is Pawanraje Nimbalkar Case)
दरम्यान, 3 जून 2006 रोजी मुंबईवरून उस्मानाबादला जात असताना नवी मुंबईच्या कळंबोलीत राजकीय वादातून पवनराजे निंबाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गोळीबारात पवनराजेंचा चालक समद काझी याचा देखील मृत्यू झाला होता. दोन अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करून त्यांच्यावर गोळीबार केला होता. या हत्येप्रकरणी माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासहित 9 आरोपी आहेत. माजी खासदार पद्मसिंह पाटील यांच्यावर पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचे प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप आहे. सप्टेंबर 2009 पासून याप्रकरणी पद्मसिंह पाटील जामीनावर बाहेर आहेत. याप्रकरणी शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे यांच्यासह माजी नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशमधील बसपा नेता कैलास यादव, तसेच शशीकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, पारसमल जैन हे संशयित आरोपी आहेत. राजकीय वैरातून 25 लाखांची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचा सीबीआयचा आरोप आहे. 14 मे रोजी वैद्यकीय कारणास्तव दोन आरोपी सुनावणीला हजर न राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर गेली. आरोपी मोहन शुक्ला आणि पद्मसिंह पाटील यांनी वैद्यकीय कारणास्तव पुढची तारीख मागितली होती. आता आज या येणाऱ्या निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागलं आहे.
माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासहित 9 जणांवर आरोप; कोण आहेत पद्मसिंह पाटील? (Padamsinh Patil)
शरद पवारांचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते पद्मसिंह पाटील हे धाराशिवच्या राजकारणातलं मोठं नाव आहे. पद्मसिंह पाटील हे एकेकाळचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे सर्वात जवळचे सहकारी होते, त्यांच्यावर सीबीआयने हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. 2006 मध्ये त्यांनी त्यांचेच चुलतभाऊ, काँग्रेसचे पवनराजे निंबाळकर यांची हत्या केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. निंबळकरांनी उस्मानाबादमध्ये पाटील यांचे राजकीय काम सांभाळले आणि दोघांनी स्थानिक सहकारी संस्था चालवल्या. उस्मानाबादचे सात वेळा आमदार राहिलेल्या त्यांची पवारांनी खास महत्त्वाच्या मंत्रालयांसाठी निवड केली होती आणि त्यांनी गृह, सिंचन आणि ऊर्जा या खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिले. २००५ मध्ये भ्रष्टाचारविरोधी कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी उघडकीस आणलेल्या भ्रष्टाचार प्रकरणामुळे त्यांना पहिला धक्का बसला. पी. बी. सावंत समितीने त्यांच्यावर कारगिल आणि गुजरात भूकंपग्रस्तांसाठी असलेल्या तेरणा साखर सहकारी संस्थेच्या पैशातून शेतकऱ्यांचा पैसा हडप केल्याचा आरोप ठेवला.
Pawanraje Nimbalkar Case : राजकीयसूडाच्या भावनेतून हत्या, 25 लाखांची सुपारी
पवनराजे दुहेरी हत्याकांडात पद्मसिंह पाटील यांच्यासह मुंबई येथील नगरसेवक मोहन शुक्ला, उत्तर प्रदेशमधील बसपा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशीकांत कुलकर्णी, लातूर येथील सतीश मंदाडे, पारसमल जैन, शूटर दिनेश तिवारी, पिंटू सिंग आणि छोटू पांडे हे संशयित आरोपी असून डॉ. पाटील हे 25 सप्टेंबर 2009 पासून जामिनावर आहेत. पद्मसिंह पाटील आणि त्यांचे चुलतबंधू पवनराजे निंबाळकर यांच्यात कमालीचे राजकीय वैर होते. याच वैर भावनेतून त्यांचा खून झाल्याचे बोलले जाते. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी 25 लाखांची सुपारी देऊन ही हत्या घडवून आणल्याचा आरोप सीबीआयचा आहे. आधी स्थानिक पोलिसांनी या हत्याकांडाचा तपास केला. मात्र नंतर पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नीने आक्षेप नोंदवल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा सीबीआयकडे सोपविण्यात आला.
