चार दिवसांपासून पोटात अन्नाचा दाना नाही, पोटच्या पोरांकडून जन्मदात्यांवर अत्याचार; सततच्या जाचाला कंटाळून वृद्ध दाम्पत्याने स्वतःला गंगेत झोकून दिलं, अन्.....
Patna News : वृद्ध जोडप्याने मुलाकडून होणारा सततचा छळ सहन न झाल्याने टोकाचे पाऊल उचलत वाहत्या गंगा नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय.

Patna News पाटणा: पाटणाजवळील बारह येथून एका खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एक घरगुती छळाचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. जिथे एका वृद्ध जोडप्याने मुलाकडून होणारा सततचा छळ सहन न झाल्याने टोकाचे पाऊल उचलत वाहत्या गंगा नदीत उडी मारून आत्महत्या (Patna Crime News) करण्याचा प्रयत्न केलाय. यात पत्नी मालती देवी ही जोरदार प्रवाहात वाहून गेलीय, तर तिचा पती धीरज चौधरी याला स्थानिकांनी वाचवले आहे.
ही घटना बारह पोलीस ठाण्याच्या परिसरातील अलखनाथ घाट येथे घडली. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, हे जोडपे नदीत वाहून जाताना दिसले होते. तेव्हा जवळच्या (Crime News) लोकांनी त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतली. यात पती धीरज चौधरीला वाचवण्यात यश आले असून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले, परंतु त्यांची पत्नी या पाण्याच्या प्रवाहात वाहत गेली आणि अद्याप सापडलेली नाही. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या प्रकरणी पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
जमीन विकली, हात-पायही तोडले, चार दिवसांपासून पोटात अन्नाचा दाना नाही
नालंदा जिल्ह्यातील पावपुरी येथील रहिवासी धीरज चौधरी यांनी नंतर पोलिसांना सांगितले की ते आणि त्यांची पत्नी चार दिवसांपासून अन्नाशिवाय भटकत होते. "माझा मुलगा आम्हाला मारहाण करायचा आणि अन्न देत नव्हता," तो म्हणाला. "आम्ही चार दिवसांपूर्वी घर सोडले आणि भुकेल्या आणि निराश झालेल्या बारह येथे आलो. आमच्याकडे कोणताही पर्याय नव्हता." त्यांनी आरोप केला की त्यांच्या मोठ्या मुलाने यापूर्वी त्यांच्यावर हल्ला केला होता, त्यांचे हात-पायही तोडले होते. तर त्यांची जमीनही विकली होती. त्यांचा धाकटा मुलगा मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले.
पतीला वाचवण्यात यश, पत्नीचा अद्याप शोध सुरु
दरम्यान, स्थानिकांनी आपत्कालीन सेवांना कळवले आणि डायल 112 वरून पोलिसांनी चौधरी यांना अधिक मदत आणि संरक्षणासाठी ताब्यात घेतले. मात्र या घटनेने सर्वत्र एकाच खळबळ उडाली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या प्रकरणी पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या:


















