Parbhani Crime News : भाऊबीजेच्या (Bhaubeej 2025) पहाटेच परभणीच्या सेलू तालुक्यातील वालूर परिसरात चोरट्यांनी अक्षरशः हैदोस घातलाय. वालूर बोरी रस्त्यावर एका शेत आखाड्याला आणि मंदिराला लक्ष करण्यात आले आहे. यात 2 ते 3 चोरट्यांनी मिळून एकाचा खून करून एका दाम्पत्याला ही बेदम मारहाण केलंय. त्यानंतर त्यांच्याकडील काही रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने घेवून पोबारा झालेय. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी स्वतः श्वान पथक, फिंगर प्रिंट तज्ञ आदी पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा तपास केला जात आहे.

Continues below advertisement

Parbhani Crime News : डोक्यात लोखंडी रॉड मारून खून, दुचाकीही चोरट्यांनी पळवली 

दरम्यान, पहाटे वालूर बोरी रस्त्यावरील एका शेत आखाड्याला दोन ते तीन चोरट्यांनी लक्ष केले. यावेळी तिथे झोपलेले 24 वर्षीय संतोष सोनवणे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून खून करण्यात आला. त्यांच्या आजीच्या कानातले चोरट्यांनी पळवले. तसेच शेजारीच असलेल्या श्री कृष्ण मंदिरावर ही जाऊन तिथे दत्तावर कोंडिबा भोकरे आणि सरूबाई भोकरे याच्यावर हल्ला करून त्यांच्या कडची रोख रक्कम आणि काही दागिने या चोरट्यांनी हिसकावून घेतले. पुढे जात बंडू भालचंद्र पवार हे शेतात दारं धरत असताना त्यांच्यावर ही या चोरट्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केलाय. तर पुढे जाऊन पारडी येथील रामेश्वर राठोड यांची दुचाकीही चोरट्यांनी पळवली आहे. ऐन दिवाळीत घडलेल्या या घटनेने संपूर्ण वालूर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Diwali : सुट्ट्यांसाठी बाहेर जात असल्याचा गवगवा सोशल मीडियावर करू नका

दिवाळीच्या (Diwali) सुट्टीत वाढत्या घरफोड्या (Burglaries)टाळण्यासाठी, पोलिसांनी (Police) नागरिकांना सोशल मीडियाच्या (Social Media) वापराबाबत एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. 'सुट्ट्यांसाठी बाहेर जात असल्याचा गवगवा सोशल मीडियावर करू नका', असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे. हल्ली अनेकजण आपल्या प्रवासाची आणि प्रत्येक क्षणाची माहिती सोशल मीडियावर शेअर करतात, पण हीच गोष्ट चोरांसाठी घरफोडी करण्याची एक संधी ठरू शकते. तंत्रज्ञानाने सज्ज असलेले चोरटे अशा अपडेट्सवर लक्ष ठेवून असतात आणि घर रिकामे असल्याची खात्री झाल्यावर चोरी करतात. त्यामुळे, बाहेरगावी जाताना मौल्यवान वस्तू बँक लॉकरमध्ये ठेवाव्यात आणि जवळच्या पोलीस स्टेशनला माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. सोशल मीडियाचा वापर जबाबदारीने करणे हे प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे, असे ब्युरो रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Continues below advertisement

हे हि वाचा