Parabhani Crime News : परभणी (Parbhani) येथील सेलू (Selu) येथून 10 वर्षीय चिमुरडीला दुचाकीवरून घेऊन जात तिच्यावर दोघांनी बलात्कार केल्या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधिक्षक जयंत मीना यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. दोन्ही आरोपी चारठाणा येथील रहिवाशी आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघेही फरार होते. यामुळं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात होता. अखेर दोन्ही नराधमांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आलं आहे. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ उद्या (गुरुवारी) सेलू बंदची हाक देण्यात आली आहे.
10 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करणारे हे नराधम एका शेतात लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीनं दोन्ही आरोपींना अटक केली आहे. सध्या या आरोपींसदर्भात फारशी माहिती मिळालेली नाही. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरु आहे. पोलीस चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींनी मुलीला ज्या दुचाकीवरुन पळवून नेलं, त्या दुचाकीला नंबर नव्हता. तसेच, त्या दुचाकीवर 'रामराज्य' असं नाव टाकलं होतं. ही दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे.
घटनेच्या निषेधार्थ उद्या (गुरुवारी) सेलू बंदची हाक
परभणीतील सेलूमध्ये भर दिवसा अशा प्रकारे चिमुकलीला घेऊन जाऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी संपूर्ण परभणीत संतापाची लाट उसळली आहे. चिमुकलीवर अत्याचार केल्याच्या केल्याच्या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्या सेलू बंदची हाक विविध सामाजिक संघटना, पक्षांनी दिली आहे.
काय घडलं होतं?
5 सप्टेंबर रोजी, सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास शहरातील एका भागातून दहा वर्षीय बालिका आणि दहा वर्षीय तिचा मावसभाऊ हे दोघे आपल्या घराकडे येत होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञातांनी त्या दोघांना मोटारसायकलवर जबरदस्तीने बसवले. या बालिकेच्या मावस भावास एका रस्त्यात सोडून देत 10 वर्षीय बालिकेस घेऊन जात तिच्यावर अत्याचार केला आणि तिथेच सोडून दिले. या प्रकरणात पीडित बालिकेच्या आईने सेलू पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून 2 अज्ञात आरोपींविरुद्ध पोक्सोसह विविध कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :