बीड : गाईंना गुंगीच औषध देऊन त्यांना पळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर आता कारवाई करण्यात येणार आहे. 'माझा'च्या बातमीनंतर राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी बीड पोलिस प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. या आरोपींना  तात्काळ अटक करून कारवाई करण्याच्या सूचना पंकजा मुंडे यांनी दिल्या. परळीतील स्नेहनगर भागात गुंगीचे औषध देऊन गाईंना चोरण्याचा प्रयत्न काही चोरट्यांनी केला होता.

शहरातील स्नेहनगर भागात शुक्रवारी रात्री गायींना खाण्याच्या पदार्थांमधून औषध देण्याचा संतापजनक प्रकार घडला. गायींना बेशुद्ध करून त्यांची तस्करी करण्याचा अज्ञात चोरट्यांचा प्रयत्न होता असा संशय स्थानिक रहिवाशांना आला. त्यांनी सतर्कता दाखवून हा प्रयत्न हाणून पाडला.

राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांना हा प्रकार समजताच त्यांनी तातडीने पोलिस अधीक्षक आणि स्थानिक पोलिस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला. या प्रकारामागे जे कोणी असतील त्यांना तातडीने अटक करून कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

गुंगीचे औषध मिश्रित पदार्थ खाल्याने ज्या गायी बाधित झाल्या होत्या त्यांच्यावर त्वरेने उपचार करण्याच्या सूचनाही पंकजा मुंडे यांनी दिल्या होत्या. त्यानंतर पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी उपचार करून चार  गायींना धोक्यातून बाहेर काढले. एका गायीवर अद्याप उपचार सुरू आहेत.

ही बातमी वाचा: