Pandharpur Accident News: पंढरपूरमध्ये मोठ्या अपघाताची घटना घडली आहे. चंद्रभागा नदीच्या पुलावर मोठा अपघात (Accident News)घडला असून कंटेनर आणि ट्रॅक्टर पुलावरून खाली कोसळलाय. कर्नाटकयेथून ऊसतोड मजूर घेऊन ट्रॅक्टर पंढरपूर (Pandharpur Accident) तालुक्यातील करकमकडे निघाला होता. दरम्यान ट्रॅक्टर सुरू होण्यापूर्वीच ट्रॅक्टर दोन ट्रॉल्यांसह पुलाखाली कोसळला आणि त्यावर कंटेनर कोसळल्याने हा भीषण अपघा त झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार दोन ते तीन मजूर या अपघातात मृत्युमुखी पडले आहे. तर ट्रॅक्टर आणि कंटेनर खाली काही जखमी झाल्याची माहिती आहे. रविवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास हि घटना घडली आहे.
Pandharpur Accident : ट्रॅक्टर आणि कंटेनर पुलावर एकत्र आले, पुलाचा अंदाज न आल्याने अपघात?
पंढरपुरातील चंद्रभागा नदीच्या आहिल्या पुलावर रविवारच्या रात्रीच्या सुमारास हि घटना घडलीय. या घटनेत जवळपास 8 ते 10 लोक गंभीर स्वरूपात जखमी झाल्याची माहिती आहे. तर गंभीर जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलंय. दरम्यान मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. ट्रॅक्टर आणि कंटेनर पुलावर एकत्र आल्याने आणि अंदाज न येता पुलाखाली पडले असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची तपास करत आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. रात्री क्रेनच्या मदतीने ट्रॅक्टर आणि कंटेनरला काढण्याचं काम करण्यात आलंय. तर जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे.
Pandharpur Accident News: दोन ऊसतोड कामगारांचा मृत्यू, अनेक जण जखमी
प्राथमिक माहितीनुसार, ट्रॅक्टरमध्ये एकूण नऊ मजूर प्रवास करत होते, तर कंटेनरमध्ये दोन लोक होते. हे सर्वजण वाहनांमध्ये प्रवास करताना रात्रीच्या वेळी अचानक पुलाखाली कोसळल्याची घटना घडलीय. रात्रीच्या अंधारात पुलाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. तर रात्री नदी पात्रात अंधार असल्याने बचावकार्यातही सुरुवातीला अडचणी आल्या. दरम्यान घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने धाव घेत जखमींना यातून बाहेर काढले. या भीषण अपघातात महादेव दिलीप काळे (वय 50) आणि राजू रमेश चव्हाण (वय 40) या दोन ऊसतोड कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर ८ जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये दोन लहान मुलांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे.
आणखी वाचा
- Solapur Crime News: वैयक्तिक रागातून बापाने पोटच्या जुळ्या मुलांना विहिरीत ढकललं, नंतर स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न; सोलापुरातील घटनेने खळबळ
- Nashik Crime News: जीपला दोरखंड बांधून ATM उखडले, नंतर जीपमध्ये टाकून ठोकली धूम, अवघ्या 12 मिनिटात चोरट्यांनी साधला डाव, पोलीसही चक्रावले