Palghar News : पालघरच्या मस्तान नाका परिसरात एकअतिशयहृदयद्रावकघटनाघडलीय. यापरिसरातील बंद दगड खाणीत दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू झालाय. मुंबई–अहमदाबाद महामार्गावरील मस्तान नाका उड्डाणपुलाच्या पश्चिमेकडील टाकवहाल हद्दीत असलेल्या बंद दगड खाणीत हिघटनाघडलीय. शुक्रवारी दुपारी दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिग्नेश विजय पवार (वय 8 वर्ष ) आणि आयुष मुकेश पवार (वय 15 वर्ष) हे तिघा मुलांसोबत खाणीत साचलेल्या पाण्यात आंघोळीसाठी गेले होते. पाण्याची खोली आणि तळाचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस ठाणेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच वसई विरार महापालिका अग्निशमन दलाने सखोल शोधमोहीम राबवली. दीर्घ प्रयत्नांनंतर जिग्नेश पवार याचा मृतदेह हाती लागला असून आयुष पवार याचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. पोलिसांनी नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवत बचावकार्य सुरळीत पार पाडले.
आठ महिन्यांपूर्वी एका महिलेचाहीयाचठिकाणी बुडून मृत्यू
दरम्यान, हीच खाण यापूर्वीही जीवघेणी ठरली असून आठ महिन्यांपूर्वी एका महिलेचा येथे बुडून मृत्यू झाला होता. तरीही खाण परिसरात सुरक्षेच्या ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
Palghar News : पालघरच्या मोखाडा तालुक्यातील बेरिस्ते गावात बिबट्याची दहशत
पालघरच्या मोखाडा तालुक्यातील बेरिस्ते गावात सध्या बिबट्याची दहशत पाहायला मिळते. मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने एका कुत्र्याची शिकार करून पळ काढला असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे . रात्रीच्या सुमारास या परिसरात सर्रासपणे बिबट्याचा वावर पाहायला मिळत असून या बिबट्याच्या दहशतीखाली सध्या परिसरातील नागरिक आहेत . वनविभागाकडून जनजागृती करण्यात आली असली तरी या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
Bhandara : वाहनाच्या धडकेत बिबट्या गंभीरभं; भंडाऱ्याच्या पवनी येथील घटना
रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला भरधाव वाहनानं जबर धडक दिली. या अपघातात बिबट्याच्या ब्रेनला गंभीर दुखापत झाली. ही घटना भंडारा - निलज मार्गावर पवनीजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच मानद वन्यजीव सदस्य पंकज देशमुख हे आरआरटी पथकासह घटनास्थळी पोहोचून तातडीनं त्याला रेस्क्यू करत नागपूरच्या गोरेवाडा प्राणी संग्रहालयात त्याला हलविलं. नागपूर येथे त्याच्यावर उपचार सुरू असून हा गंभीर बिबट एक वर्ष वयाचा असून आता वनविभाग अपघातग्रस्त वाहनाचा शोध घेत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
