एक्स्प्लोर

Palghar Crime News: ‘किरकोळ दुखापत असतानाही ICU मध्ये ठेवलं’; त्या जखमी गोविंदांची डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार, पालघर रुग्णालयातील मारहाण प्रकरणात नवा ट्विस्ट

Palghar Crime News: पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलच्या रिसेप्शनिस्टला केलेल्या मारहाण प्रकरणात नवीन ट्विस्ट आला आहे. ज्या जखमी गोविंदांवरून हा सर्व वाद सुरू झाला त्यांनीच आता डॉक्टरविरोधात तक्रार दिलीय.

Palghar Crime News: पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमधील (Relief Hospital) रिसेप्शनिस्टला मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे (Kundan Sankhe), आमदार राजेंद्र गावित (Rajendra Gavit) यांचे चिरंजीव रोहित गावित (Rohit Gavit) यांच्यासह 17 जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. ज्या जखमी गोविंदावरून (Govinda) हा संपूर्ण वाद सुरू झाला, त्याच गोविंदाने आता डॉक्टरांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.

जखमी गोविंदांनी आपल्या तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. आपल्याला किरकोळ दुखापत (Minor Injury) झाली असतानाही रुग्णालय प्रशासनाकडून जाणीवपूर्वक ICU मध्ये (Intensive Care Unit) ठेवण्यात आले आणि डिस्चार्ज (Discharge) दिला जात नव्हता, असा दावा त्यांनी केला आहे.

Palghar Crime News: ‘वारंवार विनंती करूनही डॉक्टरांनी दुर्लक्ष केलं’

जखमी गोविंदांच्या म्हणण्यानुसार, डिस्चार्ज मिळावा यासाठी त्यांनी डॉक्टरांकडे अनेक वेळा विनंती केली. मात्र, डॉक्टरांकडून त्यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे अखेर त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख कुंदन संखे यांची मदत घेतली, असा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, गरज नसतानाही आपल्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि जाणीवपूर्वक ICU मध्ये ठेवण्यात आल्याचा आरोपही जखमी गोविंदांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

Palghar Crime News: आमदार राजेंद्र गावितांसह पदाधिकारी पोलीस ठाण्यात

दरम्यान, डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी पालघर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेंद्र गावित यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि गोविंदा पथकातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने पालघर पोलीस ठाण्याबाहेर दाखल झाले. यावेळी डॉक्टरांविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्यामुळे रुग्णालयातील मारहाण प्रकरणानंतर आता डॉक्टरांविरोधातील तक्रारीमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

Palghar Crime News: ‘गुन्हा दाखल होईपर्यंत ठिय्या आंदोलन’

डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत पालघर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आमदार राजेंद्र गावित यांनी दिला आहे. त्यामुळे आधी रुग्णालयातील रिसेप्शनिस्टला मारहाण केल्याच्या प्रकरणात 17 जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता जखमी गोविंदांनी डॉक्टरांविरोधात केलेली तक्रार आणि त्यानंतर आमदारांसह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका यामुळे पालघरमधील हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Palghar Crime News: शिंदे गटात आणखी एक ‘रमेश म्हात्रे’, पालघरमध्ये हॉस्पिटल कर्मचाऱ्याला मारहाण; जखमी गोविंदांच्या बिलावरून वाद झाला अन्...; नेमकं काय घडलं?

एबीपी माझा मध्ये पालघर प्रतिनिधी म्हणून गेली पाच वर्ष कार्यरतमी मराठी न्यूज चैनल पालघर ब्यूरो म्हणून सात वर्षाचा अनुभव महाराष्ट्र 1, न्यूज चैनल मध्ये दोन वर्षाचा अनुभव
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई
Nashik Crime : नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
नाशिक हादरले! 13 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबाव, नमाज पठणाचा व्हिडीओ करून...
Nalasopara Crime : 'दोन वर्षांत हिंदू संपतील...' मैत्रिणीच्या मदतीने लव्ह जिहाद जाळं, नालासोपारा येथे तरुणीवर अनन्वित अत्याचार
'दोन वर्षांत हिंदू संपतील...' मैत्रिणीच्या मदतीने लव्ह जिहाद जाळं, नालासोपारा येथे तरुणीवर अनन्वित अत्याचार
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
सुनेत्रा पवारांचं भाषण, शरद पवारांच्या बाजुला मुख्यमंत्री फडणवीसांची जयंत पाटलांसोबत चर्चा; अनेकांच्या भुवया उंचावल्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 ऑक्टोबर 2026 | बुधवार
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
पुणे शिक्षकमध्ये भाजपचे कौस्तुभ गावडे, काँग्रेसचे जयंत आसगावकर अन् अपक्ष दत्तात्रय सावंत आणि सचिन सानप रिंगणात, कोण बाजी मारणार?
Embed widget