Palghar Crime News: पालघर तालुक्यातील नानिवली येथे शुक्रवारी पहाटे दोन तरुणांचे मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. या मृत्यूंमागे घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, पोलिसांनी (Police) सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने या प्रकरणाचा उलगडा केला आहे. ही घटना एक भीषण अपघात (Accident) आणि त्यानंतर मित्राने घेतलेला टोकाचा निर्णय असल्याचे समोर आले आहे.

Palghar Crime News: नेमकी घटना काय?

वैभव लहांगे आणि नितीन वरठा हे दोन मित्र शुक्रवारी रात्री नानिवली परिसरात एका लग्नसमारंभासाठी गेले होते. कार्यक्रम संपवून पहाटेच्या सुमारास दोघेही दुचाकीवरून घरी परतत होते. यावेळी त्यांच्या दुचाकीचा वेग अत्यंत जास्त होता. वाटेत वेगावरील नियंत्रण सुटल्याने त्यांची दुचाकी एका इलेक्ट्रिक सोलर पोलवर प्रचंड वेगाने धडकली. ही धडक इतकी भीषण होती की तो पोल तुटला आणि दुचाकी पुढे जाऊन एका झाडावर आदळली.

Palghar Crime News: अपघात आणि त्यानंतरचा थरार 

या दुर्दैवी अपघातात वैभव लहांगे याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात नितीन वरठा हा देखील गंभीर जखमी झाला होता. मात्र, आपल्या डोळ्यादेखत जिवाभावाच्या मित्राचा मृत्यू झाल्याचे पाहून नितीनला मोठा मानसिक धक्का बसला. याच विवंचनेतून आणि धक्क्यातून त्याने जवळच असलेल्या एका झाडाला गळफास लावून स्वतःचं आयुष्य संपवलं.

Palghar Crime News: सीसीटीव्हीमुळे गूढ उकललं 

सुरुवातीला या दोन्ही तरुणांचा मृत्यू संशयास्पद वाटत होता. मात्र, मनोर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली असता, अपघाताचा सर्व थरार कॅमेऱ्यात कैद झाल्याचे दिसून आले. या फुटेजमुळेच आधी अपघात झाला आणि त्यानंतर नितीनने टोकाचे पाऊल उचलले, हे स्पष्ट झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा केला आहे. दोन तरुणांचा असा करुण अंत झाल्याने नानिवली परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Cell Broadcast Alert System: मोबाईलवर 'इमर्जन्सी अलर्ट'चा सायरन वाजला? घाबरू नका! जाणून घ्या काय आहे सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम?

Bhor Crime News: गाईचं वासरु दाखवतो म्हणून चिमुरडीला गोठ्यात नेलं अन्... ते सीसीटीव्ही फुटेज समोर येताच अख्खं कुटुंब हादरलं, पुण्यातील भोरमध्ये नक्की काय घडलं?