पालघर : फक्त 50 हजार रुपयांसाठी एका आजीने आपल्या 14 वर्षीय नातीची विक्री केल्याची घटना उघडकीस आली. ही विक्री तीन वर्षांपूर्वीच करण्यात आली होती. हा प्रकार पालघरच्या वाडा तालुका (Wada Taluka) मधील कातकरी जमातीच्या (Katkari Tribe) मुलीशी संबंधित आहे. तीन वर्षांपूर्वी या मुलीची अहिल्यानगरमधील गाडे कुटुंबाला विक्री करण्यात आली आणि तिचे जबरदस्तीने लग्न लावण्यात आल्याचं समोर आलं.
या प्रकरणी, संबंधित मुलीने केलेल्या तक्रारीनंतर वाडा पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीला (Minor Girl) विकून तिचा छळ करण्यात आला. मुलीची सासरच्यांकडून छळ वाढल्यामुळे तिने वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
गुन्हा दाखल (Police Action and FIR)
वाडा पोलिस ठाण्यात या प्रकरणी मानवी तस्करी कलम 370 (Human Trafficking Act 370), कलम 420 नुसार फसवणूक (Cheating Section 420), बालविवाह प्रतिबंधक कायदा (Child Marriage Prohibition Act) आणि POCSO Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ही कारवाई अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर केली आहे.
आरोपींना अटक (Palghar Child Trafficking Case)
या प्रकरणी या अल्पवयीन मुलीचा नवरा जीवन गाडे (Jeevan Gade) आणि त्या मुलीला खरेदी करण्यामध्ये भूमिका वठवणारा दलाल रवी कोरे (Ravi Kore) यांना वाडा पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात सामील असलेल्या उर्वरित चार आरोपींचा शोध सुरू आहे. या आरोपींनी तीन वर्षांपूर्वी 14 वर्षीय मुलीची खरेदी करून जबरदस्तीने तिचे लग्न लावले होते.
छळाचे कारण (Reason for Complaint)
या अल्पवयीन मुलीला नंतर एक मुलगी झाल्यानंतर आरोपी आणि त्याच्या घरच्यांकडून तिचा छळ सुरू झाला. सासरच्यांकडून वाढलेल्या त्रासामुळे तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे आणि उर्वरित आरोपींना शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.
ही बातमी वाचा :