Pune News : पुण्यातील एनडीआरएफ अर्थात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलापासून काही अंतरावर पाकिस्तान चलनाची (Pakistani Currency) नोट आढळली, यामुळं सर्वत्र मोठी खळबळ उडाली. भुकुम गावातील मानस लेक सोसायटीत वीस रुपयांची ही नोट नेमकी कशी आली? कोणी आणली? अन कधी आणली? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालेत. सोसायटीचे चेअरमन सहदेव यादव यांच्या नजरेत ही नोट आली. सोसायटीच्या लिफ्टजवळ 8 फेब्रुवारीला ही नोट आढळल्यानंतर ती बावधन पोलिसांकडे जमा करण्यात आली. मात्र लिफ्टजवळचं सीसीटीव्ही 24 नोव्हेंबर पासून बंद आहे. त्यामुळं ही नोट सोसायटीत कशी आली? कधी आली? अन कुठून आली? याचा तपास करण्याचं आव्हान पोलिसांसमोर (Pune Police) आहे.
दारम्यान, आता त्याअनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांनी तपास सुरु केलाय. सोसायटीत 84 फ्लॅट धारक असून त्यांच्यासह सोसायटीत नेमकं कोण-कोण येऊन गेलं? त्या सर्वांची पोलीस चौकशी करतायेत. या चौकशीअंती पाकिस्तान चलनाची 20 रुपयांची नोट मानस लेक सोसायटीत कशी आली? या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.
पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सखोल तपास सुरू
पुढे आलेल्या माहितीनुसार, भुकुम गावातील मानस लेक सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर ही नोट पडलेली असल्याचे सोसायटीचे चेअरमन सहदेव यादव यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तातडीने लगेच बावधन येथील पोलिसांना संपर्क करून त्या ठिकाणी जाऊन अर्ज दिला आहे. पाकिस्तानी चलनातील सापडलेली नोट ही वापरातील असून ती अनेक वेळा वापरली असल्याचे तिच्या एकूण स्थितीवरून दिसते. ही नोट या सोसायटीच्या लिफ्टच्या बाहेर कोणाच्या खिशातून पडली की आपल्या देशामध्ये कोणाकडून आली, याचा तपास होण्याची गरज आहे. परिणामी याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी ही आता स्थानिकांनी केली आहे. मात्र हा नेमका प्रकार काय हे तपासाअंती कळू शकणार आहे.
पुणे पोलीस राबवणार गुन्हेगार दत्तक योजना, गुन्हेगारी रोखण्यासाठी निर्णय
पुणे शहरातील गुन्हेगारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि त्यांच्या गुन्हेगारी समाजविघातक कारवायांना चाप लावण्याच्या उद्देशाने शहर पोलिसांनी गुन्हेगार दत्तक योजना तयार केली आहे. या अंतर्गत पोलीस ठाण्यातील प्रत्येक कर्मचाऱ्यावर काही गुन्हेगारांची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. संबंधित कर्मचाऱ्यांनी त्याच्या यादीतील गुन्हेगाराच्या हालचाली तपासणी,त्यांच्या घरी भेट देणे किंवा त्याला ठाण्यात बोलून तपासणी करणे अधिक गोष्टी करण्यास सांगितल्या आहेत.
हे ही वाचा