एक्स्प्लोर

Nida Khan : निदा खानने पीडितेला काय-काय पाठवलं? घरी जाऊन धार्मिक विधी, नावही बदलण्याचा कट; मतीन पटेल अन् मावशीचं नाव पुढे, तपासात चक्रावणारी माहिती

Nida Khan: नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर अत्याचार करून तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील मुख्य संशयित निदा खान हिची विशेष तपास पथकाकडून कसून चौकशी केली जात आहे.

Nida Khan: नाशिकमधील बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर अत्याचार करून तिचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील मुख्य संशयित निदा खान (Nida Khan) हिची विशेष तपास पथकाने (SIT) कसून चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बाबी समोर येत आहेत. निदाने केवळ पीडितेचे मतपरिवर्तन केले नाही, तर तिच्या घरात जाऊन स्वतःच्या धर्माचे विधी केल्याचे आणि पीडितेला विशिष्ट प्रार्थना करण्यास भाग पाडल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

Nida Khan: नाव बदलण्याचा आणि ब्रेनवॉशचा कट

संशयित निदा खान हिने पीडितेचे मूळ नाव बदलून 'हानिया' करण्याचा कट रचला होता. यासाठी तिने पीडितेला धार्मिक मुद्द्यांशी संबंधित तब्बल 171 लिंक्स पाठवल्या होत्या, जेणेकरून तिचे पूर्णपणे मतपरिवर्तन करता येईल. पीडितेच्या घरी जाऊन तिला धार्मिक शिक्षण देणे, ठराविक पोशाख परिधान करायला लावणे आणि धर्माची प्रार्थना घेण्याचे धक्कादायक प्रकार निदाने केल्याचे एसआयटीच्या तपासात उघड झाले आहे.

Nida Khan: आश्रयदाता आणि 'एमआयएम' कनेक्शनचा तपास

26 मार्चपासून फरार असलेल्या निदाला 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती. निदा ज्या फ्लॅटमध्ये लपली होती, तो फ्लॅट तिच्या मावशीचा नसून संशयित एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी उपलब्ध करून दिल्याचे समोर आले आहे. निदा गर्भवती असल्याने तिच्यासोबत तिचे आई-वडील आणि मावशीदेखील तिथे उपस्थित होते. निदा ही 'एमआयएम'च्या नगरसेवकापर्यंत कशी पोहोचली आणि तिला या काळात कोणी आर्थिक रसद पुरवली, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Nida Khan: पोलीस कोठडीत वाढ होण्याची शक्यता

निदाची सुरुवातीची पोलीस कोठडी आज, सोमवारी (दि. 11) संपत असल्याने तिला पुन्हा नाशिकरोड न्यायालयात हजर केले जाणार आहे. तपासातील प्रगती आणि गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता, पोलीस तिच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी करणार आहेत. यासह या प्रकरणातील इतर संशयित दानिश शेख आणि तौसिफ अत्तार यांचाही ताबा एसआयटी घेणार असून, तिघांची समोरासमोर बसवून चौकशी केली जाणार आहे.

Nashik TCS Case: नाशिकमध्ये नऊ गुन्ह्यांची नोंद

निदा खानसह तिच्या साथीदारांविरोधात नाशिकमध्ये आतापर्यंत अत्याचार, विनयभंग, धार्मिक भावना दुखावणे आणि कट रचून धर्मांतर करणे अशा विविध कलमांन्वये नऊ गुन्हे दाखल आहेत. मुंबई नाका पोलिसांनीही या टोळीविरोधात कठोर कलमे लावून तपास सुरू केला आहे.

Nashik TCS Case: निदा खानचा मोबाइल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवला

दरम्यान, TCS प्रकरणातील आरोपी निदा खान हिचा मोबाईल क्लोनिंगसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. मोबाईलमधून डिलिट केलेले मेसेज, व्हिडीओ आणि संपर्क क्रमांक पुन्हा रिकव्हर करण्यात येणार असून, त्यातून अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. तसेच कॉल डिटेल्स, वारंवार संपर्कात असलेल्या व्यक्ती, फरार काळातील लोकेशन हिस्ट्री आणि प्रवासाचा तपशीलही SIT कडून तपासला जात असल्याची माहिती समोर आली आहे.

आणखी वाचा 

Rupali Chakankar On SIT Inquiry Ashok Kharat Case: मी अशोक खरात आणि त्याच्या पत्नीला...; एसआयटी रुपाली चाकणकर चौकशीत काय काय म्हणाल्या?

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! पोलीस ठाण्यातच 'सैराट'; मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, समुपदेशन करताना वडिलांकडूनच हल्ला
धक्कादायक! पोलीस ठाण्यातच 'सैराट'; मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, समुपदेशन करताना वडिलांकडूनच हल्ला
Solapur Crime news: जग मला वाईट म्हणेल पण मी...; पत्नीसह मुलांना संपवलं नंतर टोकाचं पाऊल उचललं, 26 पानांच्या शेवटच्या नोटमध्ये मुख्यध्यापकांनं सगळं सांगितलं, म्हणाले....
जग मला वाईट म्हणेल पण मी...; पत्नीसह मुलांना संपवलं नंतर टोकाचं पाऊल उचललं, 26 पानांच्या शेवटच्या नोटमध्ये मुख्यध्यापकांनं सगळं सांगितलं, म्हणाले....
Pune Crime News: 'क्राइम पेट्रोल' पाहून बनला सराईत चेन स्नॅचर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचला अन्...; पुण्यात अशा आवळल्या चोराच्या मुसक्या
'क्राइम पेट्रोल' पाहून बनला सराईत चेन स्नॅचर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचला अन्...; पुण्यात अशा आवळल्या चोराच्या मुसक्या
Pankaj Bhoyar : प्रणित मोरेच्या अडचणीत वाढ होण्याच्या शक्यता; गृह विभागाकडून यापूर्वीच्या सर्व व्हिडीओंची चौकशी होणार, पंकज भोयर यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले...
प्रणित मोरेच्या अडचणीत अधिक वाढ होण्याच्या शक्यता; गृह विभागाकडून यापूर्वीच्या सर्व व्हिडीओंची चौकशी होणार, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dr. Sejal Pawar : डॉ. सेजल पवारच्या अडचणीत वाढ, के.ई.एम. कडून मोठी कारवाई, 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं पण टांगती तलवार कायम
डॉ. सेजल पवारच्या अडचणीत वाढ, के.ई.एम. कडून मोठी कारवाई, 15 दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवलं पण टांगती तलवार कायम
MNS On Jain Community White Line Controversy Mumbai Road: पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारणार; मनसेचा 3 वाजेपर्यंत अल्टिमेटम, BMC चे अधिकारी थिनर घेऊन पोहोचले, दादरमध्ये राडा!
पांढऱ्या पट्ट्यांवर काळा रंग मारणार; मनसेचा 3 वाजेपर्यंत अल्टिमेटम, BMC चे अधिकारी थिनर घेऊन पोहोचले, दादरमध्ये राडा!
Pune Crime News: 'क्राइम पेट्रोल' पाहून बनला सराईत चेन स्नॅचर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचला अन्...; पुण्यात अशा आवळल्या चोराच्या मुसक्या
'क्राइम पेट्रोल' पाहून बनला सराईत चेन स्नॅचर, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सापळा रचला अन्...; पुण्यात अशा आवळल्या चोराच्या मुसक्या
जैन समाजाने बांगड्या भरल्या नाहीत; मनसेच्या संदीप देशपांडेंवर निलेश चंद्र मुनींचा पलटवार, जैन बांधवांनाही आवाहन
जैन समाजाने बांगड्या भरल्या नाहीत; मनसेच्या संदीप देशपांडेंवर निलेश चंद्र मुनींचा पलटवार, जैन बांधवांनाही आवाहन
Shreyas Iyer News : कर्णधार होताच श्रेयस अय्यरने मुंबईतील वरळीत घेतला आलिशान फ्लॅट; भाडं ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
कर्णधार होताच श्रेयस अय्यरने मुंबईतील वरळीत घेतला आलिशान फ्लॅट; भाडं ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
PM Kisan E-KYC : 30 जूनपर्यंत PM किसानची ई केवायसी करा, अन्यथा पैसे बंद, 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?
30 जूनपर्यंत PM किसानची ई केवायसी करा, अन्यथा पैसे बंद, 23 व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकऱ्यांना कधी मिळणार?
Ambadas Danve : ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
ठाकरेंचे खासदार एकनाथ शिंदेंचा संपर्कात असल्याचा चर्चेला अंबादास दानवेंचा दुजोरा; म्हणाले, 'आता हे अधिकृत कबूल करायला हवं...'
West Bengal Politics : खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
खासदारांना फोडून आम्हाला झुकवू शकत नाही; अभिषेक बॅनर्जींचे भाजपला आव्हान, CID समन्सवरून टीका 
Embed widget