मुंबई : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून (National Testing Agency NTA) घेण्यात आलेली 3 मे रोजीची नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. पेपर फुटीमुळे हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता परीक्षा नव्या तारखांना पुन्हा घेतली जाणार आहे. त्यामुळे सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्याची सविस्तर उत्तरे येथे दिली आहेत.

Continues below advertisement

NEET UG Registration : पुन्हा अर्ज करावा लागणार का?

नाही. विद्यार्थ्यांना नव्याने Registration करण्याची आवश्यकता नाही. NTA कडे आधीपासून उपलब्ध असलेला डेटा पुढील प्रक्रियेसाठी वापरला जाणार आहे.

2. NEET UG Exam Fee : पुन्हा फी भरावी लागणार का?

नाही. विद्यार्थ्यांनी आधी भरलेली परीक्षा फी वैध राहील. अतिरिक्त फी भरण्याची गरज नाही.

Continues below advertisement

3. NEET Fee Refund : आधी भरलेली फी परत मिळणार का?

होय. NTA ने स्पष्ट केले आहे की आधी भरलेली परीक्षा फी नियमांनुसार विद्यार्थ्यांना परत केली जाईल आणि पुनर्परीक्षा NTA स्वतःच्या संसाधनांतून आयोजित करेल.

4. NEET Admit Card : नवीन Admit Card जारी होणार का?

होय. नवीन परीक्षेच्या वेळापत्रकानुसार NTA पुन्हा Admit Card जारी करेल. विद्यार्थ्यांना ते अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येतील. त्याची पूर्वसूचना देण्यात येईल.

5. NEET Exam Centre Choice : पुन्हा परीक्षा केंद्र निवडावे लागेल का?

नाही. विद्यार्थ्यांनी आधी निवडलेले केंद्रांचे पर्याय NTA च्या नोंदीत कायम राहतील.

6. NEET Exam Centre Allocation : तेच परीक्षा केंद्र मिळेल का?

याबाबत अद्याप अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही. परिस्थितीनुसार NTA केंद्रांमध्ये बदल करू शकते.

7. NEET New Exam Date : NEET ची नवीन तारीख कधी जाहीर होणार?

सध्या नवीन परीक्षा तारीख जाहीर झालेली नाही. NTA लवकरच सुधारित वेळापत्रक प्रसिद्ध करणार आहे.

8. NEET Official Schedule : वेळापत्रक कुठे पाहता येईल?

परीक्षेचे अधिकृत वेळापत्रक आणि सर्व अपडेट्स NTA Official Website वर उपलब्ध होतील.

9. NEET Paper Leak CBI Investigation : प्रकरणाची चौकशी कोण करणार

Central Bureau of Investigation (CBI) कडून कथित पेपर लीक प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. सरकारने याबाबत अधिकृत आदेश दिले आहेत.

10. NEET Re Exam : 2026 मध्ये पुन्हा NEET होणार का?

होय. 3 मे 2026 रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात आली असून ती नव्या तारखांना पुन्हा आयोजित केली जाईल.

Student Advisory : विद्यार्थ्यांनी काय करावे?

  • नवीन Registration करू नका
  • अतिरिक्त Fee भरू नका
  • NTA च्या अधिकृत वेबसाइटवरील अपडेट्स नियमित तपासा
  • सोशल मीडियावरील अप्रमाणित माहितीकडे दुर्लक्ष करा
  • नवीन Admit Card आणि Exam Date ची अधिकृत घोषणा येईपर्यंत प्रतीक्षा करा.

NEET Paper Leak Case : काय आहे संपूर्ण प्रकरण?

हाती आलेल्या माहितीनुसार, 'गेस पेपर'च्या नावाखाली सुमारे 150 पानांचे दस्तऐवज प्रसारित करण्यात आले होते. त्यातील 410 प्रश्नांपैकी 120 ते 150 प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षेच्या निष्पक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

ही बातमी वाचा:


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI