एक्स्प्लोर

NEET UG 2026 Cancelled News: नाशिकमध्ये पेपर फुटला, मग हरियाणा TO बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू-काश्मीर; NEET पेपरफुटीबाबत हादरवणारी माहिती

NEET UG 2026 Cancelled News: यंदाच्या वर्षी म्हणजेच 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे.

NEET UG 2026 Cancelled News: केंद्र सरकारने नीट परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय घेतला असून यंदाच्या वर्षी म्हणजेच 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द (NEET UG 2026 Cancelled) करण्यात आली आहे. आता, ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला. देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी यंदा 3 मे 2026 रोजी नीटची परीक्षा दिली होती, त्यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. मात्र, देशभरात 42 तास अगोदरच या पेपरची प्रश्नपत्रिका बाहेर आल्याने पेपर फुटला होता. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेकडून हा परीक्षा निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (NEET UG 2026 Cancelled)

पहिले नाशिक, मग हरियाणा, नीट पेपर फुटीबाबत धक्कादायक माहिती- (How To Leak NEET Exam Paper 2026)

नीट परीक्षेचा पेपर फुटीवर विविध सवाल उपस्थित होत आहेत. नीट पेपर फुटीचा तपास सीबीआयकडे देण्यात आला असून याचदरम्यान, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फुटलेल्या प्रश्नपत्रेची पहिली प्रत नाशिकमध्ये तयार करण्यात आली होती. हीच प्रत हरियाणाला पोहोचली, जिथे या फुटलेल्या प्रश्नपत्रेचे 10 संच (sets) तयार करण्यात आले. त्यानंतर, ही फुटलेली प्रश्नपत्रिका हरियाणातून बिहार, आंध्र प्रदेश, जम्मू आणि काश्मीर तसेच राजस्थान या राज्यांमध्ये पोहोचली. दरम्यान, नाशिकमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. संबंधित व्यक्तीला इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले. संपूर्ण प्रकरणाची राजस्थान पोलिस आणि तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. पोलीसांकडून संबंधित व्यक्तीबाबत अधिक तपास सुरू आहे. 

13 व्यक्तींची CBI चौकशी करणार- (NEET UG 2026 Cancelled News)

आतापर्यंत करण्यात आलेल्या तपासावरून असे सूचित होते की, जयपूरमध्ये अटक करण्यात आलेला मनीष हाच या संपूर्ण प्रकरणामागील मुख्य सूत्रधार असल्याचे दिसून येते. प्राप्त अहवालांनुसार, प्रश्नपत्रिका छपाईसाठी जाण्यापूर्वीच, परीक्षेतील संभाव्य प्रश्न मिळवण्यात त्याला यश आले होते.आता नीट परीक्षा घोटाळ्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. 3 मे रोजी पार पडलेल्या परीक्षेदरम्यानच ही प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या परीक्षेला 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. ही परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणी CBI लवकरच पुढील कारवाई सुरू करेल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, सध्या राजस्थानच्या SOG च्या ताब्यात असलेल्या 13 व्यक्तींची CBI चौकशी करणार आहे.

विद्यार्थ्यांनी ज्या केंद्रावर परीक्षा दिली तिथेच पुन्हा परीक्षा होणार- (NEET UG 2026 Cancelled News)

3 तारखेला ज्या केंद्रावर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तिथेच पुन्हा परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा रजिस्ट्रेशनची गरज लागणार नाही. शिवाय विद्यार्थ्यांना पुन्हा होणाऱ्या नीट परीक्षेसाठी शुल्क भरावं लागणार नाही. राज्यातील 10 वी आणि 12 वी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून 10 वी नंतर अनेकांनी नीट परीक्षेची तयारी सुरू केली आहे. तर, 12 वीच्या  परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांनी NEET परीक्षा देऊन भविष्यात डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र आता नीट परिक्षा रद्द केल्यानं देशभर संतापचं वातावरण निर्माण झालं आहे.

नीटची परीक्षा रद्द का करण्यात आली? पुन्हा परीक्षा कधी होणार?, VIDEO:

संबंधित बातमी: 

मोठी बातमी! केंद्राकडून 2026 मध्ये घेण्यात आलेली NEET परीक्षा रद्द, पेपरफुटीच्या घटनेनंतर शासनाचा निर्णय

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Beed Crime News: बीडमध्ये भयंकर घटना, महाविद्यालयाच्या लिपिकाचं अपहरण; बेल्ट अन् काठीने पाठीची चामडी सोलेपर्यंत अमानुष मारहाण, नेमकं काय घडलं?
बीडमध्ये भयंकर घटना, महाविद्यालयाच्या लिपिकाचं अपहरण; बेल्ट अन् काठीने पाठीची चामडी सोलेपर्यंत अमानुष मारहाण, नेमकं काय घडलं?
Nashik Crime: 'माहेरच्यांकडून नवीकोरी कार अन् तीन लाख रुपये आण'; सासरच्या छळाला कंटाळून येवल्यात विवाहितेने आयुष्य संपवलं
'माहेरच्यांकडून नवीकोरी कार अन् तीन लाख रुपये आण'; सासरच्या छळाला कंटाळून येवल्यात विवाहितेने आयुष्य संपवलं
धक्कादायक! पुण्यातील सहकार नगर हादरलं! दोन तरुणांनी केला गोळीबार, एक जण गंभीर जखमी
धक्कादायक! पुण्यातील सहकार नगर हादरलं! दोन तरुणांनी केला गोळीबार, एक जण गंभीर जखमी
Thane Assault Case : ठाण्यातील वृद्ध मारहाण प्रकरण, 14 तासांनंतर परप्रांतीय मुजोर कॅब चालकावर गुन्हा दाखल
ठाण्यातील वृद्ध मारहाण प्रकरण, 14 तासांनंतर परप्रांतीय मुजोर कॅब चालकावर गुन्हा दाखल
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC :कुठे कुठे आंदोलन करणार? टार्गेटकाय? अभिजीत दिपकेंची पत्रकार परिषद
Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report
Is Mamata Banerjee merging TMC with Congress : ‘तृणमूल’ होणार‘काँग्रेस’? | Special Report
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar Plane: सुनेत्रा पवार एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीत जाताना विमान अचानक बिघडलं, मुंबई विमानतळावर काय घडलं?
सुनेत्रा पवार एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीत जाताना विमान अचानक बिघडलं, मुंबई विमानतळावर काय घडलं?
Gold Rate : MCX वर चांदीच्या दरात 5800 रुपयांची घसरण, सोनं 1500 रुपयांनी स्वस्त, सोने दरात घसरण कशामुळं? जाणून घ्या
MCX वर चांदीच्या दरात 5800 रुपयांची घसरण, सोनं 1500 रुपयांनी स्वस्त, सोने दरात घसरण कशामुळं? जाणून घ्या
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, महत्वाचा शासन निर्णय जारी; भाजप आमदाराकडून मे महिन्याच्या हप्त्याची तारीख जाहीर
लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याबाबत अपडेट, सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय जारी, भाजप आमदाराची मोठी घोषणा
Mira bhayandar explosive: मुंबईजवळ सापडला स्फोटकांचा साठा, एनएसजी पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं अन्...
मुंबईजवळ सापडला स्फोटकांचा साठा, एनएसजी पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं अन्...
Lok Sabha Delimitation : लोकसभेच्या जागा 824 पर्यंत वाढवा, 170 मतदारसंघांच्या विभाजनाचा प्रस्ताव, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस, वाचा सविस्तर   
लोकसभेच्या जागा 824 पर्यंत वाढवा, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेची शिफारस, देशात मतदारसंघ पुनर्रचनेची पुन्हा चर्चा
Nashik Crime: 'माहेरच्यांकडून नवीकोरी कार अन् तीन लाख रुपये आण'; सासरच्या छळाला कंटाळून येवल्यात विवाहितेने आयुष्य संपवलं
'माहेरच्यांकडून नवीकोरी कार अन् तीन लाख रुपये आण'; सासरच्या छळाला कंटाळून येवल्यात विवाहितेने आयुष्य संपवलं
Kalyan Dombivli Water Cut: केडीएमसीचा मोठा निर्णय! कल्याण-डोंबिवलीत टप्प्याटप्प्याने 24 तास पाणीपुरवठा बंद, नेमकं कारण काय?
केडीएमसीचा मोठा निर्णय! कल्याण-डोंबिवलीत टप्प्याटप्प्याने 24 तास पाणीपुरवठा बंद, नेमकं कारण काय?
RBI Bank Director: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, सहकार क्षेत्रातील दिग्गजांच्या मक्तेदारीला बसणार धक्का, काय आहे कुलिंग पिरीयडची अट?
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, सहकार क्षेत्रातील दिग्गजांच्या मक्तेदारीला बसणार धक्का, काय आहे कुलिंग पिरीयडची अट?
Embed widget