एक्स्प्लोर

NEET Paper Leak : ब्यूटी पार्लर ते नीट पेपरफुटी...वाघमारे आणि मांढरेने विद्यार्थ्यांना दिलेली ती ट्रिक, निवासस्थानी काय काय घडायचं?

NEET Paper Leak : कात्रज परिसरात राहणाऱ्या मनीषा वाघमारे आणि मॉडर्न महाविद्यालयातील प्राध्यापिका मनीषा मांढरे यांची मैत्री एका ब्युटी पार्लरमधून झाली होती.

पुणे : ब्युटी पार्लरमधील साध्या ओळखीपासून सुरू झालेला संबंध पुढे ‘नीट’ पेपरफुटीच्या संशयित रॅकेटपर्यंत पोहोचल्याची धक्कादायक माहिती ‘सीबीआय’च्या तपासातून समोर आली आहे. कात्रज परिसरात राहणाऱ्या मनीषा वाघमारे (Beautician Manisha Waghmare) आणि मॉडर्न महाविद्यालयातील प्राध्यापिका मनीषा मांढरे (Professor Manisha Mandhare) यांची मैत्री एका ब्युटी पार्लरमधून झाली होती. त्यानंतर या ओळखीचा वापर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी करण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.(Neet Paper Leak)

NEET Paper Leak : बॉटनी आणि झूलॉजी विषयांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित 

‘सीबीआय’ने अटक केलेल्या मनीषा गुरुनाथ मांढरे या ‘नीट-यूजी २०२६’ परीक्षेच्या प्रक्रियेत तज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या. राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) कडून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे बॉटनी आणि झूलॉजी विषयांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित माहितीपर्यंत त्यांना थेट प्रवेश असल्याचे तपासात समोर आले आहे. दुसरीकडे, मनीषा वाघमारे हिची विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चांगली ओळख होती. दोघीही कात्रजमधील राजस सोसायटी परिसरातील गंगा ओशन सोसायटीत वास्तव्यास असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे.(Neet Paper Leak)

NEET Paper Leak : दोघींनी मिळून घरातूनच खासगी मार्गदर्शन वर्ग सुरू केल्याचे समोर

तपास अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, वाघमारे यांच्या ब्युटी पार्लरमध्ये मनीषा मांढरे नियमित येत असत. याच ठिकाणी दोघींचा परिचय वाढला. पुढे मांढरे यांनी आपल्या कामाच्या स्वरूपाची माहिती वाघमारेला दिली होती. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वाघमारेची मदत घेतल्याचा संशय असून, त्यानंतर दोघींनी मिळून घरातूनच खासगी मार्गदर्शन वर्ग सुरू केल्याचे समोर आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात घेण्यात आलेल्या या क्लासमध्ये विद्यार्थ्यांना बॉटनी आणि झूलॉजी विषयांतील संभाव्य प्रश्न समजावून सांगितले जात होते. काही प्रश्न वहीत लिहून घेण्यास तसेच पुस्तकांमध्ये मार्क करून ठेवण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना दिल्या जात होत्या. विशेष म्हणजे, या मार्गदर्शन वर्गात चर्चिलेले अनेक प्रश्न ३ मे २०२६ रोजी झालेल्या ‘नीट-यूजी’ परीक्षेतील प्रश्नपत्रिकेशी जुळल्याचा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.

NEET Paper Leak : वाघमारेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क साधून खासगी मार्गदर्शन केल्याचा आरोप

या प्रकरणात रसायनशास्त्राचे व्याख्याते पी. व्ही. कुलकर्णी यांचे नावही समोर आले आहे. तेही ‘एनटीए’च्या परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होते आणि प्रश्नपत्रिकांपर्यंत त्यांचा प्रवेश असल्याचे सांगितले जात आहे. कुलकर्णी यांनी देखील मनीषा वाघमारेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क साधून खासगी मार्गदर्शन केल्याचा आरोप ‘सीबीआय’ने केला आहे. या वर्गांमध्ये प्रश्न, पर्याय आणि संभाव्य उत्तरे विद्यार्थ्यांना सांगितली जात असल्याचा संशय आहे.

दरम्यान, आरोपी मनीषा वाघमारे हिचा पती दंतवैद्यकीय तज्ज्ञ असल्याची माहिती समोर आली आहे. तर मनीषा मांढरे या पतीपासून विभक्त राहत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे. परिसरातील रहिवाशांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, या दोघी इतक्या मोठ्या पेपरफुटी प्रकरणात सहभागी असतील, अशी कल्पनाही कधी केली नव्हती.

NEET Paper Leak : नीट पेपरफुटीवर अनेकजण अटकेत

अवघ्या देशाला हादरवरुन सोडणाऱ्या नीट पेपर फुटीच्या गुन्ह्यात महाराष्ट्रातील अनेक जण वेगवेगळ्या पातळीवर गुंतल्याचं समोर आलं आहे. पेपर सेट करणारे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरेनीच पेपर फोडल्याचं समोर आल्यानंतर आता आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकरना सीबीआयनं अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आरसीसीच्या 101 प्रश्नांपैकीच बहुतेक प्रश्न नीटच्या परीक्षेत आल्याचं समोर आलंय.

ज्या व्हिडीओमुळे मोटेगावकरभोवती संशयाचं धुकं निर्माण झालं तो व्हिडीओही समोर आला. यानंतर मोटेगावकरांचे आर्थिक व्यवहारसुद्धा ईडीच्या रडारवर आहेत. मोटेगावकरांच्या नावावर असलेल्या संपत्तीबाबत तपशीलवार माहिती घेतली जात आहे. तसंच त्याच्या विविध आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू आहे. मोटेगावकरकडून NEET चे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे ज्यांना मिळाल्याचा संशय आहे ते विद्यार्थी आणि पालक देखील सीबीआयच्या रडारवर आहेत.

पी.व्ही. कुलकर्णी -  मास्टरमाईंड

निवृत्त केमिस्ट्री प्राध्यापक  'नीट'च्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमध्ये

प्रा. मनीषा मांढरे 

बायोलॉजी प्राध्यापिका, पुणे मॉर्डन कॉलेज'नीट'च्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमध्ये

प्रा. शिवराज मोटेगावकर 

संचालक - आरसीसी कोचिंग क्लासेसरॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा संशय

शुभम खैरनार 

बीएएमएसचा विद्यार्थी (नाशिक) श्रीमंत कुटुंबातील ढ विद्यार्थ्यांवर पाळतश्रीमंत पालकांना गाठून लाखोंचे व्यवहार

मनीषा वाघमारे 

ब्युटी पार्लरचालक, पुणे विद्यार्थ्यांना शोधून प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचवणं

धनंजय लोखंडे 

आयुर्वेद डॉक्टर, (अहिल्यानगर) सध्या पुण्यात विद्यार्थ्यांना शोधून प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचवणं. 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जुन्या वादातून माथाडी कामगार नेत्याच्या नाताला संपवलं, चार दिवसापासून फरार असलेल्या आरोपीला अखेर बेड्या
जुन्या वादातून माथाडी कामगार नेत्याच्या नाताला संपवलं, चार दिवसापासून फरार असलेल्या आरोपीला अखेर बेड्या
Pandhapur Accident: मोठी बातमी! भाविकांच्या वाहनावर काळाचा घाला, पिकअप वाहन विहिरीत पडले; 8 जणांचा मृत्यू
Pandhapur Accident: मोठी बातमी! भाविकांच्या वाहनावर काळाचा घाला, पिकअप वाहन विहिरीत पडले; 8 जणांचा मृत्यू
मुंबईत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई, 53 लाखांचा मुद्देमाल जप्त, 4 आरोपीं पोलिसांच्या ताब्यात
मुंबईत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई, 53 लाखांचा मुद्देमाल जप्त, 4 आरोपीं पोलिसांच्या ताब्यात
Beed Crime News :अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता; बीडच्या माजलगावात प्रशासनाची धावपळ
अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता; बीडच्या माजलगावात प्रशासनाची धावपळ
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Tandulwadi Accident Savior : तांदूळवाडीतील अपघात कसा घडला? 'देवदूत' इरफानने पाच जणांचा जीव वाचवला!
Tukaram Mundhe Special Report:तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन
Shiv Sena UBT Operational Friction: उबाठाचे तेच पाच खासदार, उद्धव ठाकरेंच्या बैठकीला अनुपस्थिती, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
Sanjay Raut PC : धारावी ताब्यात घेण्यासाठी अदानींनी पाकिस्तानातून गुंड आणलेत, राऊतांचे आरोप
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
ममता बॅनर्जींच्या फुटीर 20 खासदारांनी निवडणूक आयोगाकडे नोंदणी असलेला, पण मान्यता नसलेला त्रिपुरातला पक्ष निवडला, पण भाजपला पाठिंबा दिला, पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा करणार
Iran War Live Update: भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
भारतासकट जगाला दिलासा मिळणार? अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारात काय काय ठरलं? पहिल्यांदाच माहिती समोर!
Solapur Accident: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
Video: खुदा का फरिश्ता... चिमुकल्याला बुडताना पाहून थेट विहिरीत उडी; देवदूत इरफानने 5 जणांचा जीव वाचवला
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या स्वागताला, देवेंद्र फडणवीस अन् सुनेत्रा पवारांची 'शाळा' ठरली; एकनाथ शिंदेंनी सायकल वाटल्या
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
BLOG: दुष्काळाची व्हायरल चर्चा आणि जांभूळ आख्यान, महाभारताच्या काळातलं फळ
Morena Train Accident: इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
इंटरसिटी एक्स्प्रेसला आग लागल्याची खोटी अफवा पसरली, प्रवासी ट्रॅकवर उतरले अन् विरुद्ध दिशेनं येणाऱ्या दुसऱ्या एक्स्प्रेसनं चार जणांना चिरडलं
Malshiras Pickup Accident : माळशिरसमध्ये पिकअप विहिरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू, रस्ता सुरक्षा उपाय योजना नाहीत, बैठका होतात पण कंत्राटदारांवर कारवाई होत नाही, धैर्यशील मोहिते पाटील यांचं वक्तव्य
माळशिरसमध्ये भीषण अपघात, धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, चार चार वर्ष कामं अपूर्ण, पत्रव्यवहार केला तरी दखल घेत नाहीत...
Solapur Accident: दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
दिंडोरीतील विहिरीत वाहन पडून 9 जण, माळशिरसमध्ये 8 मृत्युमुखी; अपघात 'हॉटस्पॉट'वर सरकार लक्ष देणार का?
Embed widget