पुणे : नीट पेपर फुटी प्रकरणात अटकेत असलेल्या प्राध्यापिका मनीषा मांढरे हिच्यावर अखेर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून मनीषा मांढरेच्या निलंबनाचे आदेश जारी करण्यात आले आहेत. महाविद्यालयाच्या प्रशासकीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. मनीषा मांढरेचा नीट पेपरफुटीमध्ये हात असल्याचं समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

मनीषा मांढरे हिचा नीट पेपरफुटीमध्ये हात असल्याचं समोर आल्यानंतर ती ज्या ठिकाणी प्राध्यापिका म्हणून कार्यरत होती त्या मॉडर्न महाविद्यालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत मनीषा मांढरे हिच्या निलंबनाबाबत चर्चा करण्यात आली.  या चर्चेनंतर अखेर मनीषा मांढरेच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. मनीषा मांढरे ही या महाविद्यालयात प्राणीशास्त्राची प्राध्यापिका होती. 

मनीषा मांढरे हिच्या संदर्भातली घटना शिक्षण क्षेत्राच्या प्रतिमेला बाधा पोहोचवणारी आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात येत असल्याचं पत्र महाविद्यालयाकडून काढण्यात आलं आहे. दरम्यान, मनीषा मांढरे हिला सीबीआयने अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे. 

NEET Paper Leak : नीट पेपरफुटीवर अनेकजण अटकेत

अवघ्या देशाला हादरवरुन सोडणाऱ्या नीट पेपर फुटीच्या गुन्ह्यात महाराष्ट्रातील अनेक जण वेगवेगळ्या पातळीवर गुंतल्याचं समोर आलं आहे. पेपर सेट करणारे प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरेनीच पेपर फोडल्याचं समोर आल्यानंतर आता आरसीसी कोचिंग क्लासचे संचालक शिवराज मोटेगावकरना सीबीआयनं अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आरसीसीच्या 101 प्रश्नांपैकीच बहुतेक प्रश्न नीटच्या परीक्षेत आल्याचं समोर आलंय.

ज्या व्हिडीओमुळे मोटेगावकरभोवती संशयाचं धुकं निर्माण झालं तो व्हिडीओही समोर आला. यानंतर मोटेगावकरांचे आर्थिक व्यवहारसुद्धा ईडीच्या रडारवर आहेत. मोटेगावकरांच्या नावावर असलेल्या संपत्तीबाबत तपशीलवार माहिती घेतली जात आहे. तसंच त्याच्या विविध आर्थिक व्यवहारांची छाननी सुरू आहे. मोटेगावकरकडून NEET चे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरे ज्यांना मिळाल्याचा संशय आहे ते विद्यार्थी आणि पालक देखील सीबीआयच्या रडारवर आहेत.

'नीट'चे गुन्हेगार (H)

पी.व्ही. कुलकर्णी -  मास्टरमाईंड

निवृत्त केमिस्ट्री प्राध्यापक  'नीट'च्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमध्ये

प्रा. मनीषा मांढरे 

बायोलॉजी प्राध्यापिका, पुणे मॉर्डन कॉलेज'नीट'च्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलमध्ये

प्रा. शिवराज मोटेगावकर 

संचालक - आरसीसी कोचिंग क्लासेसरॅकेटमध्ये महत्त्वाची भूमिका बजावल्याचा संशय

शुभम खैरनार 

बीएएमएसचा विद्यार्थी (नाशिक) श्रीमंत कुटुंबातील ढ विद्यार्थ्यांवर पाळतश्रीमंत पालकांना गाठून लाखोंचे व्यवहार

मनीषा वाघमारे 

ब्युटी पार्लरचालक, पुणे विद्यार्थ्यांना शोधून प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या सूत्रधारांपर्यंत पोहोचवणं

धनंजय लोखंडे 

आयुर्वेद डॉक्टर, (अहिल्यानगर) सध्या पुण्यात विद्यार्थ्यांना शोधून प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या सूत्रधारापर्यंत पोहोचवणं. 

ही बातमी वाचा: